Saturday, June 29, 2024

पडद्याआड सारासाेबत राेमॅंटीक झाली शेहनाज; अभिनेत्री म्हणाली, ‘माझी सर्व लिपस्टिक संपली…’

शहनाज गिलची फॅन फॉलोइंग खूप जबरदस्त आहे. शहनाज सोशल मीडियावर सुंदर फाेटाे आणि व्हिडिओ शेअर करण्यासोबतच, तिच्या ‘देसी वाइब्स विथ शहनाज गिल’ या चॅट शोमुळे देखील चर्चेत आहे. या शोमध्ये मनोरंजन जगतातील प्रसिद्ध कलाकार शहनाजसाेबत त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनाबद्दल मजेदार खुलासे करताना दिसतात. अशात सारा अली खान शेहनाजच्या आगामी एपिसोडमध्ये दिसणार आहे, ज्याचा प्रोमो व्हिडिओ समोर येताच व्हायरल झाला आहे.

शहनाज गिल (shehnaaz gill) आणि सारा अली खान (sara ali khan) यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ ‘देसी वाइब्स विथ शहनाज गिल’च्या आगामी एपिसोडचा प्रोमो आहे, ज्यामध्ये सारा तिच्या आगामी ‘गॅसलाइट’ चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसणार आहे. मात्र, क्लिपमध्ये दिसणारे दृश्य पाहून सगळेच थक्क झाले आहेत.

प्रोमो व्हिडिओची सुरुवात शहनाज गिलपासून होते, जी स्क्रीनवर ‘नॉक-नॉक’ करताना दिसत आहे. काही वेळातच, सारा अली खान पडद्याआडून बाहेर येते आणि चित्रांगदा सिंगचे सुपरहिट गाणे ‘कुंडी माट खडकाओ राजा, सीधा अंदर आओ राजा’ गाण्यास सुरुवात करते. हे ऐकून शहनाज पडदा बंद करते आणि दोघी पडद्यामागे चुळबूळ करू लागतात. मजा तर तेव्हा येते, जेव्हा शहनाज बाहेर येते आणि म्हणते की, ‘माझी सर्व लिपस्टिक संपली आहे.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

शहनाज गिल आणि सारा अली खानची ही छोटी क्लिप पाहून चाहते खूप आश्चर्यचकित झाले आहेत, तसेच आगामी भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. लोकांना खात्री आहे की, सना आणि शहनाज यांच्यामधील संवाद मजेदार असणार आहे.

शहनाज गिलच्या ‘देसी वाइब्स विथ शहनाज गिल’ या चॅट शोला प्रेक्षकांचा खूप सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. सारा अली खानपूर्वी शाहिद कपूर, सुनील शेट्टी, आयुष्मान खुराना आणि कपिल शर्मा यांच्यासह अनेक स्टार्स या शाेमध्ये येऊन मजेदार गॉसिप करताना दिसले आहेत.(bollywood actress sara ali khan sana romance in desi vibes with shehnaaz gill kissing video viral)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा –
धक्कादायक! महेश मांजरेकरांच्या सिनेमाच्या शुटींगवेळी मोठा अपघात, 19 वर्षीय तरुण किल्ल्यावरुन दरीत कोसळला अन्…
माेठी बातमी! ‘आई कुठे काय करते’ फेम गौरी कुलकर्णीचा अपघात; अभिनेत्री गंभीररित्या जखमी

हे देखील वाचा