Friday, December 8, 2023

‘चुका होणे माझ्या प्रवासाचा’ म्हणत सतत फ्लॉप चित्रपट देणाऱ्या सारा अली खानने सोडले मौन

बॉलिवूडमध्ये सध्या शाहरुख खान सोडला तर सर्वच टॉपच्या कलाकारांसाठी फ्लॉपचा काळ चालू आहे. टॉपचे अभिनेते आणि अभिनेत्री फ्लॉप सिनेमा देत असल्यामुळे मोठ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. अक्षय कुमार, आयुष्मान खुराणा, कंगना रणौत आदी अनेक कलाकारांनी फ्लॉप सिनेमे दिले आहेत. याच यादीत आता अभिनेत्री सारा अली खानचे देखील नाव आले आहे. २०१८ साली मोठ्या गाजवजयंत तिने अभिषेक कपूरच्या ‘केदारनाथ’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती अनेक चांगल्या चित्रपटांमध्ये दिसली. त्याच्या अभिनयाचे प्रेक्षक आणि समीक्षक दोघांनी भरभरून कौतुक केले होते. मात्र मधल्या काही काळापासून साराचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवु शकलेले नाही. लगातार फ्लॉप देणाऱ्या चित्रपटांबद्दल नुकतेच सारा अली खानने भाष्य केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

प्राप्त माहितीनुसार सारा अली खान म्हणाली, “एक अभिनेत्री म्हणून मी रोजच भरपूर काही शिकत असते आपल्या प्रवासात देखील शिकणे आहेच. मी नेहमीच काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करत असते. पण मला असेही वाटते की मी काही चुका केल्या आहेत. मी असे चित्रपट केले आहेत जे लोकांना आवडले नाहीत. पण मी हे नक्कीच सांगेन की या वयात चुका होतात. आपण पडून पुन्हा उभे राहणे देखील महत्वाचे आहे, आणि ते आपल्याला आले पाहिजे. चुका होणे माझ्या प्रवासाचा भाग आहेत. शिवाय माझी स्वतःची अशी काही तत्व आहेत.”

दरम्यान मधल्या काही काळापासून सारा अली खानचे नाव भारतीय क्रिकेटर असणाऱ्या शुभमन गिलसोबत जोडले जात आहे. दोघांना अनेकदा स्पॉट केले गेले. मात्र या दोघांनी अजूनपर्यंत त्यांच्या नात्यावर भाष्य केलेले नाही. सारा अली खानच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर ती लवकरच ‘गॅसलाइट’, ‘ए वतन मेरे वतन’, ‘मेट्रो इन दिनों’, ‘मर्डर मुबारक’ आदी चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तत्पूर्वी ‘ए वतन मेरे वतन’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. हा चित्रपट स्वातंत्र्यसेनानी उषा मेहता यांच्या जीवनावर आधारित आहे

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जान्हवी विमानतळावर ‘बाॅयफ्रेंड’साेबत झाली स्पाॅट, पॅपराझींची नजर पडताच लाजली अभिनेत्री

कुटुंबाने का केले नाहीत तारक मेहता यांचे अंत्यसंस्कार? घ्या कारण जाणून…

हे देखील वाचा