Monday, April 15, 2024

ईदची पार्टी न दिल्याने जावेद अख्तर अन् शबाना आझमी दु:खी, व्हिडिओ शेअर करून सांगित ‘हे’ कारण

लेखक आणि गीतकार जावेद अख्तर, त्यांची पत्नी आणि अभिनेत्री शबाना आझमी सोबत दरवर्षी जवळच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत ईद साजरी करतात. ते दरवर्षी ईदच्या जेवणाचे आयोजन करतात, ज्यात त्याचे सर्व सहकारी आणि चित्रपट जगतातील अनेक स्टार्स आनंदाने उपस्थित असतात, परंतु यावर्षी त्यांनी ईदची पार्टी दिली नाही, ज्यामुळे अभिनेत्री शबाना यांना दुःख झाले आहे.

शबाना आझमी (shabana azmi) यांनी यंदाच्या ईदला जेवणाची मेजवानी देऊ न शकल्याबद्दल दु:ख व्यक्त केले असून एक व्हिडिओ शेअर करत त्याचे कारणही सांगितले आहे. त्यांनी आपल्या घराची स्थिती स्पष्ट करणारा एका व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी आपल्या घराचे रिनाेवेशन सुरू असल्याचे दाखवले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shabana Azmi (@azmishabana18)

व्हिडीओ शेअर करताना शबाना आझमी म्हणाल्या की, “या वर्षी आमच्या घराची रिनाेवेशनमुळे अशी अवस्था झाली आहे, त्यामुळे आम्ही आमच्या सर्व मित्रांची माफी मागतो की, आम्ही नेहमीप्रमाणे याही वेळीही ईदच्या दिवशी दुपारचे जेवण देऊ शकलो नाही. पुढील वर्षी ईदच्या दिवशी ते शक्य होईल. सर्वांना ईद मुबारक.” हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चाहते त्यांना ईदच्या शुभेच्छा देत आहेत. मंडळी, आम्ही तुम्हाला सांगतो की, शबाना आणि जावेद अख्तर जवळपास प्रत्येक सणाला त्यांच्या जवळच्या मित्रांसोबत पार्टी करतात, ज्यांचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात.

शबाना आझमीच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाले, तर त्या पुढे निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात दिसणार आहे. शबाना आझमीसोबत या चित्रपटातआलिया भट्ट, रणवीर सिंग, जया बच्चन आणि धर्मेंद्र यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 28 जुलै रोजी सिनेमागृहात प्रदर्शित हाेणार आहे. (bollywood actress shabana azmi apologises to their friends and reveals why she and javed akhtar did not host eid )

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अर्पिता शर्माच्या ईद पार्टीत धोनीची पत्नी अन् लेक झिवाची राॅयल एन्ट्री, साक्षीच्या लूकने चाहत्यांना पाडली भूरळ

शीझान खानने तुनिषा शर्माला म्हटले ‘चांद’! अभिनेत्रीसाेबतचा ‘ताे’ फाेटाे केला शेअर

हे देखील वाचा