Tuesday, April 23, 2024

शीझान खानने तुनिषा शर्माला म्हटले ‘चांद’! अभिनेत्रीसाेबतचा ‘ताे’ फाेटाे केला शेअर

तुरुंगातून सुटल्यापासून शीजान खान सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि आपल्या भावना कवितेच्या माध्यमातून शेअर करत आहे. त्याची एक्स गर्लफ्रेंड तुनिषा शर्माला आठवून तो कधी फाेटाे, व्हिडिओ तर कधी कविता लिहित असताे. अशात नुकतेच शीजनने तुनिषाला चांद म्हणत ‘चांद रात’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

शुक्रवारी ‘चांद रात’ होती. या खास प्रसंगी शीझान खानने आपल्या प्रियजनांना चांद रातच्या शुभेच्छा दिल्या आणि तुनिषा शर्माला चांद असे संबोधले. शीझानने इन्स्टा स्टोरीवर एक नोट लिहित म्हणटले की, “त्या चंद्राला शुभेच्छा जो नजरेपासून दूर आहे!” याशिवाय शीजान खानने एक पोस्ट देखील शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने ‘अली बाबा: दास्तान ए काबुल’च्या सेटवरील अनेक जुने फोटो शेअर केले आहेत. शेवटच्या फाेटाेत तो तुनिषासोबत हसताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sheezan M Khan BABA (@sheezan9)

तुनिषा शर्माने 24 डिसेंबर 2022 रोजी ‘अली बाबा’च्या सेटवर गळफास लावून आत्म’हत्या केली. आत्म’हत्येच्या 15 दिवस आधी तुनिशा आणि शीजानचे ब्रेकअप झाले होते, त्यामुळे अभिनेत्री खूप नाराज होती. वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी या अभिनेत्रीच्या आत्म’हत्येने तिच्या चाहत्यांसह संपूर्ण देश हादरला. लेकीच्या आत्म’हत्येनंतर तुनिषाच्या आईने शीजान खानवर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यामुळे शीजानला 25 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. अनेक महिने तुरुंगात राहिल्यानंतर मार्चच्या पहिल्या आठवड्यात त्यांची सुटका झाली. तेव्हापासून तो त्याच्या चाहत्यांशी जोडला गेला आहे.

‘अली बाबा’मध्ये शीजान खानच्या जागी अभिषेक निगमची निवड करण्यात आली आहे. मात्र, चाहत्यांना अजूनही शीजानला अली बाबाच्या भूमिकेत पाहायचे आहे.(tv actor sheezan khan called tunisha sharma chaand as he wished fans chaand mubarak he shared photo with actress )

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बिग बॉसच्या ‘या’ लोकप्रिय चेहऱ्यावर मॉडेल इशिता गुप्ताने लावला कपडे आणि स्टाइल चोरण्याचा आरोप

आलियाची चप्पल उचलातानाचा रणबीरचा ‘ताे’ व्हिडिओ व्हायरल; साेशल मीडिया युजर्स म्हणाले…

हे देखील वाचा