Wednesday, July 3, 2024

शहनाज गिलने भुवन बमला विचारले, ‘तुला मी कशी वाटते?’ मिळाले मजेशीर उत्तर, पाहा व्हायरल व्हिडिओ

शहनाज गिल ही मनोरंजन विश्वातील एक प्रसिद्ध सेलिब्रिटी असून तिचे फॅन फॉलोइंग प्रचंड आहेत. अलीकडेच शहनाजने तिचा ‘देसी वाइब्स विथ शहनाज गिल’ हा शो चॅट लॉन्च केला आहे, जो तिच्या यूट्यूब चॅनेलवर प्रसारित होताे. अशात अभिनेत्रीने यूट्यूबर भुवन बामसाेबत चॅट शो देसी वाइब्सवर संवाद साधला. याशाेमध्ये भुवन बाम त्याच्या ‘ताजा खबर’ या वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी आला हाेता. यादरम्यान, दाेघांनीही खूप रंजक विषयांवर चर्चा केली. भुवन बाम व्लॉगिंग करायचा. त्याच्या मजेदार कंटेंटमुळे तो प्रेक्षकांमध्ये खूप प्रसिद्ध झाला.

शहनाज गिल (shehnaaz gill) हिने तिच्या आगामी एपिसोडचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये शहनाज भुवन बामशी बोलताना दिसत आहे. यादरम्याान शहनाज भुवन बामला विचारते की, ‘तुला मी कशी दिसते? या प्रश्नावर भुवन बाम यांने मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. व्हिडिओ शेअर करताना शहनाज गिलने लिहिले की, ‘घरगुती की मग..? मला तुमची निवड सांगा.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

भुवन बाम ‘ताज्या खबर’ वेब सिरीजमध्ये दिसत आहे. त्यांच्याशिवाय या वेबसिरीजमध्ये श्रेया पिळगावकरची महत्त्वाची भूमिका आहे. हे डिस्ने प्लस हॉटस्टारवर 5 जानेवारी 2023 रोजी रिलीज झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

शहनाज गिल नुकतीच ‘हौसला रख’ या चित्रपटात दिसली होती. ती लवकरच सलमान खानसोबत ‘किसी का भाई किसी का जान’मध्ये दिसणार आहे. भुवन बामचा सोशल मीडियावरही मोठा चाहतावर्ग आहे. त्याची स्टाइल चाहत्यांना माेठ्या प्रमाणात आवडते. तो अनेकदा त्याच्या चाहत्यांशी संवादही साधतो.(bollywood actress shehnaaz gill asked bhuvan bam do you like me got funny answer watch viral video)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आदित्य राॅय कपूरला महिला करणार हाेती जबरदस्तीने किस, अभिनेत्यानं असे वाचवले स्वत:ला…

‘बिग बाॅस 16’चा विजेता एमसी स्टॅन इंस्टग्रामवरुन करताे भक्कड कमाई, आकडे पाहून तुम्हीही व्हाल थक्क

हे देखील वाचा