Thursday, March 28, 2024

‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाच्या टिझरमध्ये दिसलेली शहनाज गिल गेली चांगलीच भाव खाऊन

सलमान खानच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमाचं टिझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. बऱ्याच काळापासून या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये भरपूर चर्चा होती. अखेर आता हा टिझर समोर आला आहे. या सिनेमाचा १ मिनिट ४३ सेकंदाचा ट्रेलर पाहून हे नक्कीच स्पष्ट झाले आहे की, सिनेमात सलमान खान एक दमदार भूमिका साकारत आहे. एका नव्या आणि हटके अवतारात लोकांसमोर येणार आहे. ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाचा टिझर चांगलाच गाजत असून लोकं सलमानच्या ऍक्शन अवताराचे चांगलेच कौतुक करत आहेत. मात्र ‘किसी का भाई किसी की जान’ हा टिझर समोर आल्यानंतर सलमानसोबतच अजून एक वेगळीच चर्चा रंगली आहे.

‘किसी का भाई किसी की जान’ टिझर समोर आल्यानंतर सलमानसोबत अजून एका चेहऱ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे, आणि तो चेहरा म्हणजे अभिनेत्री शहनाज गिलचा. टिझरमध्ये सलमान खान आणि पूजा हेडगेच्या रोमान्ससोबतच पंजाबची कॅटरिना कैफ असणाऱ्या शहनाज गिलची देखील झलक यात पाहायला मिळाली. तिला सिनेमात पाहिल्यानंतर तिचे फॅन्स चांगलेच खुश झाले आहेत. या टिझरमध्ये शहनाज गिल एकदम देसी इंडियन अवतारात दिसत असून, अतिशय सुंदर दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

सोशल मीडियावर सलमान खान आणि शहनाज गिल यांचे फोटो तुफान व्हायरल होत असून, त्यांना चांगलेच पसंती मिळत आहे. सोबतच शहनाज तर ट्विटरवर देखील ट्रेन्डिंगमध्ये टॉपला आली आहे. तिचा साऊथ इंडिया अवतार सगळ्यांचा आवडत असून त्यात तिचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे. शहनाज गिलसोबतच श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी देखील दिसत आहे. शहनाज आणि पलक दोघी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. या सिनेमात ऍक्शन, ड्रामा आणि रोमांस सर्वच भरपूर असणार हे नक्की.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘नाद कार पण…! शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ चित्रपटाची पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई
अथिया शेट्टीचा नमस्कार करताना दिसला अहान शेट्टी, फोटो पोस्ट करत म्हणाला…

हे देखील वाचा