अभिनेत्री शमिता शेट्टीच्या 44 व्या वाढदिवसानिमित्त एका शानदार पार्टीचे आयाेजन करण्यात आले हाेते. या पार्टीत जिथे चाहते शमिता आणि शिल्पा शेट्टीच्या साैंदर्यावर घायळ झालेत, तिथे शिल्पाचा पती राज कुंद्रा ट्रोल होताना दिसला. बर्थडे पार्टीत पॅपराझींच्या विनंतीवर शामिता आणि शिल्पा दाेघीनींही जबरदस्त पोझ दिल्यात, तर राज पार्टीत चेहरा लपवत पोहोचला. राजचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर साेशल मीडिया युजर्स भिन्नभिन्न कमेंट करत आहेत.
तर झाले असे की, शमिता शेट्टी (shamita shetty) हिच्या वाढदिवसानिमित्त एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत अभिनेत्रीच्या खास मित्र आणि कुटुंबीयांना आमंत्रित करण्यात आले होते. बर्थडे गर्लने लाल रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता, तर शिल्पा व्हाइट टॉप आणि ब्लॅक शॉर्ट्समध्ये हाॅट दिसत हाेती. शिल्पा तिची बहीण शमिताचा हात धरून पार्टीला जाताना दिसली. यावेळी पॅपराझींच्या विनंतीवर शिल्पाने जबरदस्त पोजही दिल्यात. अशात चाहते शिल्पाच्या लूकचे आणि गॉर्जियस स्टाइलचे कौतुक करताना दिसले.
पण जेव्हा शिल्पा शेट्टीच्या पतीची गाडी आली, तेव्हा राज कुंद्रा हेल्मेट घालून कारमध्ये बसलेले दिसला. पॅपराझींना पाहताच राज पटकन गाडीतून उतरला आणि पार्टीच्या गेटवर हेल्मेट काढून आत गेला. पॅपराझींना टाळण्यासाठी राजने हे केले असेल, पण सोशल मीडिया युजर्सना ते आवडले नाही.
View this post on Instagram
राज कुंद्राने यापूर्वीही असे केले आहे. राजचा हा व्हिडिओ पाहून एका युजरने ‘मार्वेल मूवी का व्हिलन’ अशी मजेशीर कमेंट केली आहे, तर दुसऱ्याने ‘बायकाे आणि साळी आपला जलवा दाखवत आहे आणि आरकेला चेहरा लपवावा लागत आहे’ अशी कमेंट केली. त्याचवेळी एकाने लिहिले, ‘काश त्याने चेहरा लपवण्याचे काम केले नसते.’
View this post on Instagram
शिल्पा शेट्टीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पार्टीमधील व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शमिता केक कापताना खूप आनंदी दिसत आहे.(bollywood actress shilpa shetty looks stunning at shamita shetty birthday bash but raj kundra arrived in helmet video viral netizens trolls)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
‘या गोष्टी खूप विचित्र आहेत’, विवेक ओबेरॉयबद्दलच्या ‘त्या’ प्रश्नावर सलमानने दिले होते उत्तर
धक्कादायक! दाक्षिणात्य लेडी सुपरस्टार असणाऱ्या नयनताराने देखील घेतला होता कास्टिंग काऊचचा विदारक अनुभव