Monday, July 1, 2024

डास पाहून दिलेल्या प्रतिक्रियेमुळे शिल्पा होतेय ट्राेल, पाहा भन्नाट व्हिडिओ

बाॅलिवूड लाेकप्रिय अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या सौंदर्य आणि फिटनेसमुळे कायमच चर्चेत असते. चाहते तिचे प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतात, पण अलीकडेच पॅपराझींच्या कॅमेऱ्यात कैद झालेल्या शिल्पाने असे काही केले की सगळे तिला ट्रोल करत आहेत. कोणी तिला कमेंट करत सल्ला देत आहेत, तर कोणी तिला बालिशपणा दूर करण्यास सांगत आहे.

साेशल मीडियावर व्हायरल हाेत असलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी (shilpa shetty) कारमध्ये बसत आहे. यादरम्यान, तिच्या कारचा दरवाजा बंद करत असताना काही डास तिच्या कारमध्ये घुसले. अशा स्थितीत ती डास पाहून ओरडताना दिसली. यासोबतच ती या डासांना हाताने उडवून मारत देखील आहे. शिल्पाच्या या प्रतिक्रियेमुळे तिचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अशा परिस्थितीत ती युजर्सच्या ट्रोलचीही शिकार होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

व्हिडिओ पाहून युजर्स तिला अशा रिऍक्शनसाठी खूप ट्राेल करत आहेत. एक युजरने ट्राेल करत लिहिले की, ‘एवढा त्रास होत असेल, तर गाडीत मच्छरांचे रॅकेट ठेवा.’ तर दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘नेहमीच ओव्हर ऍक्टिंग’. एका युजरने तर चक्क कमेंट करत लिहिले की, ‘शिल्पाची मुलंही तिच्यापेक्षा जास्त मॅच्युअर आहेत, तिची बालिश कृत्ये सहन होत नाहीत’. एका युजरने कमेंट केली की, ‘मोठ्या लोकांचे डास डायनासोरसारखे दिसतात.’

शिल्पा शेट्टी लवकरच ओटीटीमध्ये पदार्पण करणार आहे. तिने रोहित शेट्टीच्या कॉप सीरिज ‘इंडियन पोलिस फोर्स’चे शूटिंग सुरू केले आहे. या सीरिजमध्ये सिद्धार्थ मल्होत्राही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपुर्वी अभिनेत्रीने या  सीरिजशी संबंधित एक पोस्टर शेअर केले होते, ज्यामध्ये ती पोलिसाच्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती.(bollywood actress shilpa shetty reacted like this after seeing mosquitoes fans said big people think mosquitoes are dinosaurs )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सुनील शेट्टीने पहिल्यांदाच दाखवली आपल्या आलिशान बंगल्याची झलक, पाहा व्हिडिओ

नोरा फतेहीने जॅकलिन फर्नांडिस विरोधात दाखल केला मानहानीचा खटला

हे देखील वाचा