आज म्हणजेच रविवारी (दि. 14 मे)ला ‘मदर्स डे’ जगभरात साजरा केला जात आहे. या खास दिवशी प्रत्येकजण आपल्या आईला खास पद्धतीने मदर्स डेच्या शुभेच्छा देत आहे. दुसरीकडे, या खास प्रसंगी, बॉलिवूडच्या सर्व सेलिब्रिटींनीही त्यांच्या आईसोबतचे फोटो शेअर करून मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच त्यांच्यासाठी सुंदर नोटही लिहिली आहे. या मदर्स डेच्या निमित्ताने कोणत्या सेलिब्रिटींनी आपल्या आईला खास शुभेच्छा दिल्या आहेत. चला तर, जाणून घेऊया…
सोनम कपूर हिने आईसोबतचा लहानपणीचा फोटो शेअर करत मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोनमने फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, “जगातील सर्वोत्कृष्ट मातांना ‘मदर्स डे’च्या शुभेच्छा… माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.”
View this post on Instagram
तर दुसरीकडे शिल्पा शेट्टीनेही आपल्या आईला खास पद्धतीने मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर आई आणि मुलांसह एक फोटो शेअर करत लिहिले, ” ब्लेस विथ द बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स, निस्वार्थ प्रेम आणि बिनशर्त आशीर्वादांच्या प्रत्येक दिवसासाठी मनापासून आभार.” मातृ दिन.”
View this post on Instagram
मदर्स डेच्या निमित्ताने अभिनेता गुरमीत चौधरीनेही त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर त्याच्या पत्नीचा ,आईचा आणि मुलींसोबतचा फोटो शेअर केला आहे. तसेच मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
टीव्ही अभिनेत्री चारू असोपा हिनेही मदर्स डेच्या निमित्ताने आपल्या लाडक्या मुलीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. फाेटाेत चारू तिच्या झोपलेल्या मुलीला प्रेमाने किस करताना दिसत आहे. यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “तुम्हा सर्व सुंदर मातांना मातृदिनाच्या शुभेच्छा. तुम्ही सर्व आश्चर्यकारक आहात.”
View this post on Instagram
माजी मिस युनिव्हर्स आणि अभिनेत्री सुष्मिता सेननेही मदर्स डेच्या निमित्ताने तिच्या आईसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये सुष्मिता तिच्या आईसोबत हसत पोज देताना दिसत आहे. यासोबत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “हॅपी मदर्स डे!!! जीवनासाठी देवाची सर्वात मोठी भेट… !!! सर्व मातांना नेहमीच प्रेम आणि आदर !!! माझी रॉक आई, आई, अम्मा असल्याबद्दल धन्यवाद.”
View this post on Instagram
बॉलिवूड अभिनेता विकी कौशलनेही मदर्स डेच्या निमित्ताने आपल्या आईसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फाेटाेत अभिनेत्याने हिंदीत आई असे लिहिले आहे.(bollywood actress shilpa shetty to sonam kapoor these celebs wished their mothers on mothers day 2023)
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अभिनेत्री झरीन खानचे वजन झाले होते 113 किलो, असा आहे अभिनेत्रीचा ‘फॅट टू फिट’ प्रवास
सलमानने ‘या’ कारणास्त ममता बॅनर्जींची घेतली भेट, मुख्यमंत्री ट्विट करत म्हणाल्या, ‘कला, समाज अन्…’