बाॅलिवूडची लाेकप्रिय अभिनेत्री शिल्पा शेट्टी डायरेक्टर रोहित शेट्टी याच्या ‘इंडियन पोलिस फोर्स’च्या सेटवर जखमी झाली होती. अभिनेत्रीला तिच्या दुखापतीतून बरे होऊन काहीच काळ झाला असून आता ती पुन्हा तितक्याच उत्साहाने फिटनेस रुटीन फाॅलाे करत आहे. शिल्पा नेहमीच फिटनेसचे गाेल पूर्ण करत असते. शिल्पा बाॅलिवूड मधील सर्वात फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. जखमी झाल्यावरही तिने हार मान नाही तिचे काम सुरु ठेवले.
आज अभिनेत्री शिल्पा शेट्टी (shilpa shetty) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक ‘मंडे मोटिव्हेशन’ व्हिडिओ शेअर केला आहे, जो खूप प्रेरणादायी आहे. अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना फिटनेस राखण्यासाठी प्रवृत्त केले असून त्यांच्यासाठी एक सुंदर नाेटही लिहिली आहे. शिल्पाने लिहिले, “आयुष्य तुमच्यासमोर कोणत्या प्रकारचे आव्हान येईल याने काहीही फरक पडत नाही, पाऊल उचलणे आणि त्याचा सामना करणे महत्त्वाचे आहे.’
शिल्पाने पुढे कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आज माझी सोमवारची प्रेरणा ‘स्टेप अप’ ग्लूट-एक्टिवेटर वर्कआउटने सुरू होते. हे ग्लूट आणि पायांचे स्नायू मजबूत करते व प्रीहॅब आणि रिहॅबसाठी खरोखर चांगले आहे.
View this post on Instagram
ती पुढे म्हणते, “माझ्या डाव्या गुडघ्याच्या टिबिअल फ्रॅक्चरमधून मी बरी होत असल्याने, मी ते सहजरित्या करत आहे. म्हणून, मी हे रुटीन अधिक थेट दृष्टिकोनाने केले आहे. या प्रकारचे वर्कआउट आवश्यक आहे. कारण, ते कमकुवत बाजू मजबूत करण्यास आणि त्यावर मात करण्यास मदत करते. विशेषत: दुखापतीनंतर बरे होण्याच्या काळात हे केल्याने स्नायूंमध्ये असंतुलन निर्माण होत नाही.”
शिल्पाच्या वर्कफ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर शिल्पा ‘सुखी’ नावाच्या चित्रपटात दिसणार आहे. यासाेबतच ती “इंडियन पोलिस फोर्स ‘मधून ओटीटीवर पदार्पण करणार आहे. (bollywood actress shilpa shetty workout video returned to gym after recovering from injury an)
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सोनम कपूरने बिपाशाच्या मुलीसाठी पाठवले ‘हे’ सुंदर गिफ्ट, अभिनेत्रीने दाखवली झलक
अर्रर्र! असं काय घडलं की, झलकच्या मंचावर करणच्या डाेळ्यात तरळले अश्रू?