Wednesday, April 24, 2024

सोनम कपूरने बिपाशाच्या मुलीसाठी पाठवले ‘हे’ सुंदर गिफ्ट, अभिनेत्रीने दाखवली झलक

अभिनेत्री बिपाशा बसू आणि अभिनेता करण सिंग ग्रोव्हर नुकतेच एका मुलीचे पालक झाले आहेत. दोघेही सध्या पेरेन्ट्सहुडचा आनंद घेत आहेत. लग्नाच्या सहा वर्षांनंतर पालक बनलेल्या या सेलिब्रिटीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 12 नोव्हेंबरला दोघांनीही मुलगी देवीचे त्यांच्या घरी स्वागत केले. दरम्यान, बिपाशाला बॉलिवूडमधील लाेकप्रिय अभिनेत्री सोनम कपूरकडून शुभेच्छा आणि भेटवस्तू मिळाल्या आहेत. त्याची एक झलक बिपाशाने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केली.

अभिनेत्री बिपाशा बसू (bipasha basu) हिने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एका सुंदर गिफ्ट बॉक्सची झलक दिसत आहे. स्टाेरी शेअर करताना बिपाशाने सांगितले की, “तिची मुलगी देवी हिला सोनम कपूर आणि आनंद आहुजाचा मुलगा वायू यांच्याकडून भेट मिळाली आहे.” या भेटवस्तूंसोबत हाताने लिहिलेले कार्डही आहे.

Bipasha Basu

कार्डमध्ये लिहिले आहे की, “प्रिय बिप्स आणि करण.. तुमच्या बाळाचे अभिनंदन.” बाळ एक आशीर्वाद आहे आणि मला खात्री आहे की, ‘देवी’ तुम्हाला खूप प्रेम देईल.” सोनम आनंद आणि वायु. यावर बिपाशाने लिहिले, “धन्यवाद सोनम कपूर, आनंद आहुजा आणि वायु…देवीला तुमच्या भेटवस्तू आवडल्या.” करण आणि बिपाशा बसू यांनी नुकतेच त्यांच्या मुलीचे नाव आणि तिची झलक शेअर केली असून पोस्टमध्ये लिहिले की, “माता राणी स्वतः त्यांच्या घरी आली आहे आणि म्हणून त्यांनी आपल्या मुलीचे नाव देवी ठेवले आहे.” ती माता दैवी असल्यामुळे तिला देवी असे नाव देण्यात आले आहे.

Bipasha Basu

अलीकडेच सोनमनेही तिच्या मुलीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये करण सिंग ग्रोव्हरने मुलीला हातात धरले होते. या पोस्टसोबत बिपाशाने एक सुंदर नाेटही लिहिली होती. करण आणि बिपाशा ‘अलोन’ चित्रपटाच्या सेटवर भेटले होते तिथे दाेघांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात यांनतर दाेघेही 30 एप्रिल 2016 रोजी लग्न बंधनात अडकले. (bollywood actress sonam kapoor sent beautiful gifts for actress bipasha basu daughter)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अर्रर्र! असं काय घडलं की, झलकच्या मंचावर करणच्या डाेळ्यात तरळले अश्रू?

प्रेमासमाेर नतमस्तक! ‘या’ स्टार्सनी लग्नासाठी चक्क धर्मच टाकला बदलून, पाहा यादी

हे देखील वाचा