Saturday, June 29, 2024

अभिनेत्री सुश्मिता सेन हिने सांगितला मिस युनिव्हर्स स्पर्धेचा रंजक किस्सा म्हणाली, ‘मला तेव्हा एवढी….,’

अभिनेत्री सुष्मिता सेन हिला काही दिवसांपूर्वीच हृदयविकाराचा झटका आला होता. याची माहिती तीने स्वतः सोशल मीडियावर शेअर केली होती. आता अभिनेत्री पूर्णपणे बरी झाली असून तिने व्यायाम करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. ती एक धाडसी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तसेच सुश्मिता सेन हीने 1994 मिस युनिव्हर्स म्हणजेच ‘विश्वसुंदरी’ हा किताब पटकावला आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिला एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्या वेळी तिला तो प्रश्नच समजला नव्हता पण तिने ज्या हुशारीने असे उत्तर दिले की, परीक्षकही तिच्या उत्तराने प्रभावित झाले. चला तर बघूया सुश्मिताचे उत्तर नक्की काय होते?

डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर सुष्मिता सेन आता पूर्णपणे तंदुरुस्त झाली असून फिटनेसमध्ये गुंतली आहे. सुष्मिताने आंतरराष्ट्रीय महिला दिनी तिला सशक्त बनवणारी पोस्ट केली होती आणि आता ती कविता वाचताना दिसली. तिच्या बळावर जगणाऱ्या या अभिनेत्रीला जिंकण्याची हिंमत आणि चैतन्य मिळाले आहे. कदाचित त्यामुळेच 1994 साली मिस युनिव्हर्स स्पर्धेत इंग्रजीत विचारलेल्या प्रश्नाचा अर्थ न समजल्यानंतरही तिने आत्मविश्वासाने उत्तरे देऊन विश्वसुंदरी किताब पटकावला  होता. हा मजेशीर किस्सा खुद्द सुष्मितानेच उघड केला आहे.

हिंदी माध्यमात शिकणाऱ्या अनेकांना इंग्रजी भाषेबाबत न्यूनगंड असतो. पण हिंदी माध्यमात शिकलेल्या सुष्मिताने काही वर्षांपूर्वी सांगितले होते की भाषा कोणतीही असो ज्ञान आणि माहिती महत्त्वाची असते. तिने सांगितले होते की, मिस युनिव्हर्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत जेव्हा तिला प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिला इंग्रजीतील एका शब्दाचा अर्थ समजला नाही. तरीही तिने कोणालाच समजू न देता पूर्ण आत्मविश्वासाने उत्तरे देत परीक्षकांची मने जिंकली.

वास्तविक सुष्मिता सेनला अनेकदा कोणत्या ना कोणत्या शोमध्ये बोलावले जाते आणि तिला तिच्या आयुष्याशी संबंधित प्रेरणादायी गोष्टी शेअर करण्यास सांगितले जाते. असेच आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सुष्मिता सेनची मुलगी अलिशा हिच्या शाळेत शाळेच्या मासिकेसाठी मुलाखत घेतली. तेव्हा तिला विचारण्यात आले की, एवढ्या वर्षानंतर अंतिम स्पर्धेतील प्रश्नाचे उत्तर तुला बदलायचे आहे का? यावर उत्तर देतांना ती म्हणाली की, त्यांनी मला स्रीच्या गुणांविषयी नव्हे तर स्रीच्या ‘इसेंस’ बद्दल विचारले होते. मी हिंदी माध्यमातून शिकले आहे. त्यामुळे मला तेव्हा एवढी इंग्रजी भाषा येत नव्हती. पण माहित नाही मला इसेंस या शब्दाचा काय अर्थ समजला आणि मी एकदम बरोबर उत्तर दिले. तेव्हा मी 18 वर्षांची होती. मला वाटल की माझ्या जिभेवर सरस्वती आहे आणि म्हणाली की,चला हे बोलून देऊ कारण भविष्यात तु तुझे आयुष्य असेच निवडेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

सुष्मिताने सांगितले होते की, ‘मी म्हणालो होते की, स्त्री म्हणून जन्म घेणे ही ईश्वराची मोठी देण आहे. मी अजूनही त्यावर कायम आहे. त्यात काहीही बदल झालेला नाही. स्त्री म्हणून जन्म घेणे ही ईश्वराची सर्वात मोठी भेट आहे. आपण सर्वांनी त्यासाठी आभार मानले पाहिजेत. स्त्री ही केवळ गर्भ नाही, जेथून जन्म घेतो. म्हणून ती केवळ जन्म देणारी आईच नव्हे  तर प्रेम आणि काळजी करणारी देखील आहे.’

वयाच्या 18 व्या वर्षी सुष्मिताचे स्त्रीबद्दलचे जे विचार होते. ते आजही तसेच आहेत. तिच्या या धाडसीपणामुळे ती हृदयविकाराला मात देऊन, पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे. (bollywood-actress-shushmita-sen-miss-universe-pageant-winner-1994-insident-share)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अभिनेता आकाश कुंभारचे ‘गडद अंधार’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण
अभिनेते शाहबाज खान यांनी आईच्या सांगण्यावरून सोडले संगीत, काय आहे यामागची गोष्ट? एकदा जाणून घ्याच

हे देखील वाचा