सोनम कपूरला बॉलिवूडची स्टायलिश अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. सोशल मीडियावरही ती तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. अशातच सोनम कपूर नुकतीच अॅपलचे सीईओ टिम कुकसोबत आयपीएल मॅचमध्ये दिसली होती. यावेळी अभिनेत्रीने साडी नेसली होती. तिने मॅचसाठी साडी नेसणे का निवडले यावर अभिनेत्रीने नुकतेच पाेस्ट शेअर केली आहे. काय म्हणाली अभिनेत्री? चला जाणून घेऊया…
सोनम कपूर (sonam kapoor) अलीकडेच गुरुवारी (दि. 20 एप्रिला)ला पती आनंद आहुजा आणि टीम कुकसोबत दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सचा सामना पाहण्यासाठी गेली होती. यानंतर फॅशन स्टाईलिश सोनम कपूरने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर मॅचनंतर अवघ्या काही वेळात सुंदर साडीतील फोटो शेअर केलेत.
View this post on Instagram
या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले, “विंटेज दागिन्यांसह साध्या लिनेन साडीमध्ये. मला भारतीय उन्हाळ्यात साड्या नेसायला सर्वात सोयीस्कर वाटतात. साधेपणाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काही उत्तम आणि सुंदर साड्या तयार केल्याबद्दल @anavila_m धन्यवाद!”
View this post on Instagram
या साध्या साडीत साेनम कपूर खूपच सुंदर दिसत होती. याशिवाय सोनम सध्या मुलगा वायुसोबत वेळ घालवत आहे. आनंद आहुजाला दीर्घकाळ डेट केल्यानंतर अभिनेत्रीने 8 मे 2018 रोजी लग्न केले. त्यानंतर तिने 20 ऑगस्ट 2022 रोजी त्यांचा मुलगा वायुचे या जगात स्वागत केले. सध्या अभिनेत्री तिच्या कुटुंबात व्यस्त आहे.
साेनम कपूरच्या अभिनय काराकिर्द बाेलायचे झाले तर, तिने ‘सावरिया’, ‘संजू’, ‘प्रेम रतन धन पायो’,’नीरजा’ यासारख्या दमदार चित्रपटात काम केले आहे. (bollywood actress sonam kapoor shared photos on instagram in saree actress said this is more comfortable in indian summer)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कॅलिफाेर्नियात सुट्टयांचा आनंद घेताना मृण्मयी देशपांडे, फाेटाे व्हायरल
अजयची लेक न्यासा देवगणचा वाढदिवस साजरा करतानाचा ‘ताे’ व्हिडिओ व्हायरल, एकदा पाहाच