Tuesday, April 23, 2024

अजयची लेक न्यासा देवगणचा वाढदिवस साजरा करतानाचा ‘ताे’ व्हिडिओ व्हायरल, एकदा पाहाच

काजोल आणि अजय देवगण यांची लेक न्यासा देवगण 20 वर्षांची झाली आहे. यानिमित्त अजय आणि काजोलने आपल्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. इतकेच नव्हे तर अजयने न्यासाला आपला ‘अभिमान’ असे वर्णन केले. यादरम्यान न्यासाचा वाढदिवस साजरा करतानाचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती केक कापताना दिसत आहे.

न्यासाच्या वाढदिवसानिमित्त मावशी तनिषा मुखर्जीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये, न्यासा वडील अजय आणि आजी वीणा देवगण यांच्यासोबत केक कापताना दिसत आहे. यावेळी न्यासाच्या चेहऱ्यावर हसू आहे आणि ती टाळ्या वाजवतानाही दिसत आहे. न्यासाच्या वाढदिवसानिमित्त सर्वजण तिला शुभेच्छा देत असून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

nysa devgan
nysa devgan

काजोलने 24 फेब्रुवारी 1999 मध्ये अजय देवगणसोबत गुपचूप लग्न केले होते आणि 4 वर्षांनी 20 एप्रिल 2003 रोजी मुलगी न्यासाला जन्म दिला. त्याच वेळी, 2010 मध्ये, काजोल दुसऱ्यांदा आई झाली आणि तिने मुलगा युगला जन्म दिला. न्यासाचे शालेय शिक्षण सिंगापूरमध्ये झाले आहे. अशात न्यासाच्या वाढिदवसानिमित्त काजाेलने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पाेस्ट शेअर केली. यासाेबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “ही आमची आणि आमची कायमची कहाणी आहे. तुझा सेंस ऑफ ह्यूमर, माइंड आणि सुंदर हार्ट लव्ह यू बेबी गर्ल. तू आनंदी राहा व कायम माझ्यासोबत रहा.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kajol Devgan (@kajol)

अजय देवगणनेही आपल्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याने अनेक फोटो शेअर केले होते. यामध्ये वडील आणि मुलीचे नातेही दिसून आले. अलीकडेच काजोल तिच्या मुलीबद्दल बोलली. तिने सांगितले की, ‘त्यांची मुलगी स्वत: ला खूप चांगल्या प्रकारे सांभाळते आणि त्यांच्या निर्णयांचे समर्थन करते.'(nysa devgan birthday video bollywood actor ajay devgan and kajol daughter turns 20 celebrates by cutting cake video )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अपहरण अन् मारहाणीच्या आराेपावर हनी सिंगने साेडले माैन; म्हणाला, ‘माझी प्रतिमा डागाळण्यासाठी…’

कॅलिफाेर्नियात सुट्टयांचा आनंद घेताना मृण्मयी देशपांडे, फाेटाे व्हायरल

हे देखील वाचा