Saturday, June 29, 2024

सुष्मिता सेन मिस युनिव्हर्स बनण्यामागे इंदिरा गांधीचा हाेता हात, जाणून घ्या काय आहे कनेक्शन

29 वर्षांपूर्वी 21 मे या दिवशी पहिल्यांदाच एका भारतीयाने मिस युनिव्हर्सचा ताज पटकवला होता. ताज भारतात आणणारी ही व्यक्ती दुसरी कोणी नसून सुष्मिता सेन होती. 29 मे 1994 रोजी सुष्मिता सेनने भारतासाठी मिस युनिव्हर्सचा किताब जिंकून इतिहास रचला. 42व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत 77 देशांतील स्पर्धकांनी भाग घेतला होता, अशात या स्पर्धेत सर्वांना मागे टाकत सुष्मिता सेन विजयी ठरली हाेती. हा विजय खूप माेठी गाेष्ट हाेती. कारण, याआधी कोणत्याही भारतीयाने हे विजेतेपद पटकावले नव्हते.

मिस युनिव्हर्स स्पर्धेत सुष्मिता सेनच्या उत्तराने सर्वांचीच मनं जिंकली होती, ज्यामुळे अभिनेत्री विजयी ठरली. खरं तर, सुष्मिताला विचारलं होतं की, ‘तुम्ही कुठलीही ऐतिहासिक घटना बदलू शकत असाल तर ती काय असेल? यावर सुष्मिताने दिलेले उत्तर म्हणजे ‘इंदिरा गांधीं‘चा मृत्यू हाेते. अशात सुष्मिताला आज मिस युनिव्हर्सचा ताज पटकवून 29 वर्ष झाली आहेत. या खास प्रसंगी अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट करत आपला आनंद व्यक्त केला आहे. सुष्मिता सेनने सोशल मीडियावर तिचा एक थ्रोबॅक फोटो शेअर करून चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली, ज्यावर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

47 वर्षीय सुश्मिता सेन तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. सुश्मिताने रेनी आणि अलिशा या दोन मुलींना दत्तक घेतले आहे. याशिवाय ती तिच्या लव्ह लाईफबद्दलही खूप चर्चेत आहे. काही काळापूर्वीपर्यंत ती रोहमन शॉलला डेट केल्यामुळे चर्चेत होती, त्यानंतर ललित मोदीसोबतच्या तिच्या नात्याच्या बातम्याही खूप चर्चेत आल्या होत्या. मात्र, काही काळानंतर त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्याही समोर आल्या. अशात आता पुन्हा एकदा सुष्मिता एक्स बॉयफ्रेंड रोहमनसोबत स्पॉट झाली आहे.( bollywood actress sushmita sen celibrates 29 years of miss universe win the actress won the title by answering this question )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
इलियाना डिक्रूझने प्रेग्नंसीमध्ये लुटला लाँग ड्राईव्हचा आनंद, चाहते म्हणाले, ‘बाळाचा बाप काेण?’

मनाेज वाजपेयीच्या अभिनयाला चाहत्यांची दाद; नव्या सिनेमाचा ट्रेलर पाहून म्हणाले, ‘ऑस्कर देऊन टाका…’

हे देखील वाचा