Monday, June 17, 2024

सुष्मिता सेनने पुन्हा पकडला एक्स बाॅयफ्रेंड रोहमन शॉलचा हात? अभिनेत्रीचा ‘ताे’ व्हिडिओ व्हायरल

हृदयविकाराच्या झटक्यानंतर अभिनेत्री सुष्मिता सेनचे आयुष्य हळूहळू रुळावर येत आहे. अभिनेत्री कामाच्या आघाडीवरही सक्रिय झाली आहे. अभिनेत्रीने वर्कआउट देखील सुरू केले आहे. अशात नुकतेच सुष्मिता सेनने इन्स्टाग्रामवर तिचा एक वर्कआउट व्हिडिओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये सुष्मितासोबत तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलही दिसत आहे. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेऊया…

सुष्मिता सेन (sushmita sen) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये सुष्मिता सेन तिची धाकटी मुलगी आणि एक्स बॉयफ्रेंड रोहमनसोबत वर्कआउट करताना दिसत आहे. यासोबत अभिनेत्रीने कॅप्शन लिहिले आहे, “इच्छाशक्ती हा एकमेव मार्ग आहे! 36 दिवस उलटून गेले आहेत आणि आता अधिक ट्रेनिंग आवश्यक आहे! मी लवकरच ‘आर्य’च्या शूटिंगसाठी जयपूरला रवाना होत आहे. आणि… हे माझे सर्वात प्रिय लोक आहेत, जे नेहमी माझ्यासोबत असतात.”

सुष्मिता आणि रोहमनला एकत्र पाहिल्यानंतर चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘तुम्हा दोघांना एकत्र पाहून आमच्या चेहऱ्यावर हसू आले आहे. तुम्ही दोघंही एकत्र खूप सुंदर दिसत आहात.’, तर दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘तुला रोहमनसोबत पाहून आनंद झाला.’ अशात आणखी एका युजरने लिहिले की, ‘तुम्ही दोघे पुन्हा रिलेशनशिपमध्ये आले आहात का?’ इतकेच नाही तर काही युजर्स दोघांना लग्न करण्याचा सल्लाही देताना दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

सुष्मिता सेनला गेल्या महिन्यात हृदयविकाराचा झटका आला होता. अभिनेत्रीच्या हार्टमध्ये 95 टक्के ब्लॉकेज आढळले, त्यामुळे डॉक्टरांना अँजिओप्लास्टी करावी लागली. याचा खुलासा स्वत: अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओद्वारे केला. मात्र, आता अभिनेत्री तंदुरुस्त आहे आणि नेहमीच्या रुटीनवर परतत आहे.(bollywood sushmita sen shares video with ex boyfriend rohman shawl netizen ask relationship status)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मोठी बातमी! प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचे निधन, वयाच्या 69व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

व्हायरल झालेल्या नुसरत जहां आणि यश दासगुप्ता यांच्या ‘त्या’ बोल्ड व्हिडिओमुळे खासदार ट्रोल

हे देखील वाचा