बॉलिवूड कलाकार नेहमीच सोशल मीडियावर त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर करत असतात. यात अभिनेत्री सुष्मिता सेनचा देखील समावेश होतो. ती प्रत्येक दिवशी तिचे फोटो आणि आयुष्यातील अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असते. मागील काही दिवसात तिने मिस युनिवर्सच्या दरम्यानचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. हा फोटो बघून तिचे चाहते खूपच खुश झाले होते. तिच्या या फोटोवर कमेंटचा वर्षाव होत होता. या आधी तिने वेब सीरिज ‘आर्या’च्या दुसऱ्या सीजनची शूटिंग सुरू करणार असल्याची माहिती देखील दिली होती. नुकतीच सुष्मिताने एक खास गोष्ट तिच्या चाहत्यांना सांगत तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सुष्मिताने सांगितले की, वयाच्या 45 व्या वर्षी देखील तिच्याकडून चुका होत असतात. या सोबतच तिच्या चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील तिने दिली आहेत.
अभिनेत्री सुष्मिता सेनने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर करून लिहिले आहे की, “तुम्ही मला नेहमी विचारत असता की, मी सुट्टी घेते का? तर हो मी सुट्टी घेते. तू नेहमी सकारात्मक असते का? तर नाही मी नेहमीच सकारात्मक नसते.”
तिने पुढे सांगितले की, “वयाच्या 45 व्या वर्षी देखील मी काही गोष्टी निवडताना चुका करते. त्यामुळे मला फार दुःख होते. मी खोट बोलणाऱ्याला ओळखते का? तर यातून माझ्याकडून कोणीच वाचू शकत नाही.”
तिने पुढे सांगितले की, “मी जे काही शिकले आहे ते हे आहे की, ते कितीही कठीण असले तरी चालेल पण आपल्याला त्याच्याकडे कर्माच्या रुपात पाहिले पाहिजे. जे कधी ना कधी आपल्याला फेडावे लागणार आहे.”
सुष्मिता सेनसाठी 2020 हे वर्ष खूप चांगले होते. या वर्षी तिने चित्रपट सृष्टीत पुन्हा आगमन केले आहे. हॉटस्टारची वेब सीरिज ‘आर्या’मध्ये तिने मुख्य भूमिका निभावली होती. यामधील तिचा अभिनय सर्वांना खूप आवडला होता. तिचे चाहते तिच्या अभिनयाचे खूप कौतुक करत होते. आता या सीरिजच्या दुसऱ्या भागाची सर्वांना खूप उत्सुकता लागली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-