Wednesday, December 3, 2025
Home बॉलीवूड मधूचंद्राची रात्र साजरी केल्यानंतर सासरी जाताना स्वारा भास्करचे अश्रू अनावर, व्हिडिओ व्हायरल

मधूचंद्राची रात्र साजरी केल्यानंतर सासरी जाताना स्वारा भास्करचे अश्रू अनावर, व्हिडिओ व्हायरल

बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्करने 13 मार्च रोजी समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमदसाेबत दिल्लीत कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले. सोशल मीडियावर अभिनेत्रीने तिच्या लग्नाच्या प्रत्येक फंक्शनचे फोटो आणि व्हिडिओ एकामागून एक शेअर केले आहे. अशात स्वराचा पाठवणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल हाेत आहे, ज्यावर चाहते भन्नाट प्रतिक्रिया करत आहेत.

स्वरा भास्कर (Swara Bhasker) हिच्या पाठवणीचा व्हिडिओ समोर आला आहे. यादरम्यान अभिनेत्री खूप भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. या व्हिडिओमध्ये स्वराने गुलाबी रंगाच्या हेवी लेहेंगा परिधा केला हाेता, ज्यात अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत हाेती. याव्यतिरिक्त व्हिडिओमध्ये अभिनेत्रीसोबत तिचा पती फहाद आणि आई इरा देखील दिसत आहेत.

अभिनेत्रीच्या वडिलांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले, #SwaraBhasker लग्न संपत असताना हा ‘क्षण’ शेअर केल्याबद्दल @sinjini_m धन्यवाद/होय… ‘कठोर’ कमांडरला फ्रेम पासून दुर राहण्याचे चांगले कराण हाेते. आपल्या लाडक्या ‘खडूस वडिलां’साठी भावनिकदृष्ट्या खास क्षण आहे… ‘विदाई’ आमच्या प्रियेची.

अभिनेत्रीची पाठवाणी शनिवारी झाली. त्यानंतर ती संध्याकाळी बरेलीमध्ये तिच्या सासरच्या घरी पोहोचली. जिथे तिचे जोरदार स्वागत करण्यात आले. अभिनेत्रीची गाडी सासरच्या दारात येताच फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात तिचे जोरदार स्वागत करण्यात आले.

दिल्लीत होळीनंतर अभिनेत्रीच्या लग्नाचे कार्यक्रम सुरू झाले आणि आठवडाभर चालले. यात हळदी, संगीत, मेहंदी, लग्न, कव्वाली नाईट आणि रिसेप्शन साेहळ्याचा समावेश होता. या जोडप्याने 6 जानेवारी रोजी कोर्ट मॅरेज केले होते, ज्याचा खुलासा सुमारे 40 दिवसांनी झाला. या जोडप्याच्या प्रेमकथेबद्दल बोलायचे झाले, तर त्याची सुरुवात 2019-2020 मधील चळवळीने झाली, ज्यावेळी स्वरा विद्यार्थ्यांमध्ये जोरजोरात घोषणा देत होती. तिथूनच दोघांच्या विचारांची गाठ पडली.(bollywood actress swara bhasker and fahad ahmad wedding actress cries during vidai)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा –
मलायकाचे अर्जुन कपूरसाेबत अफेअर असतानाही अरबाज का भेटताे अभिनेत्रीला? अभिनेत्याने स्वत: केला खुलासा
कार्तिक आर्यन करणार लग्न? अभिनेत्याच्या घोषणेने उडाली खळबळ, जाणून घ्या कोण होणार नववधू

हे देखील वाचा