Tuesday, June 18, 2024

काय सांगता! स्वरा ही फहदची पहिली नसून आहे दुसरी पत्नी? अभिनेत्री खुलासा करत म्हणाली…

अभिनेत्री स्वरा भास्कर पती फहाद अहमदसोबत लग्नानंतर पहिल्यांदाच त्यांच्या मित्राचा वाढदिवस साजरा करत आहे. मात्र, स्वरा आणि फहाद यांच्यामध्ये दुसरं कुणीतरी घुसलंय, असं सगळ्यांनाच वाटत आहे, ज्याला स्वराने तिची सवतन म्हटले आहे. स्वराने तिच्या सोशल मीडिया हँडलवर पती फहाद अहमदसोबतचे काही फोटो शेअर केले आणि त्याच्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, स्वराने चाहत्यांना तिच्या सवतनची ओळखही करून दिली. मात्र, मंडळी  स्वराचा सवतन दुसरा कोणी नसून तिचा आणि तिचा नवरा फहादचा खास मित्र अरिश कमर आहे, ज्याला स्वरा तिची सवतन मानते.

स्वरा भास्कर (swara bhasker) हिने अलीकडेच तिच्या अधिकृत इन्स्टा अकाऊंटवरून पती फहाद आणि अरिश कमरसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या पोस्टसोबत स्वराने कॅप्शन लिहिले की, ‘आमचा मित्र, कॉम्रेड आणि फहादचा मूळ जीवन साथीदार अरिश कमर याला वाढदिवसाच्या शुभेच्छा.’ याशिवाय, स्वराने नेहमीच तिच्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल, तिची सर्व न्यायालयीन कागदपत्रे वेळेवर सादर केली जातील याची खात्री केल्याबद्दल, तिची साक्षीदार असल्याबद्दल आणि आतापर्यंतचा ताे सर्वोत्तम ‘सौतन’ असल्याबद्दल त्याचे आभार मानले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

स्वरा भास्करच्या या पोस्टनंतर चाहते आरिशला बेस्ट सवतन म्हणत आहेत. स्वराच्‍या पोस्‍टवर एका चाहत्‍याने कमेंट करत लिहिले की, ‘आतापर्यंतची सर्वोत्तम सवतन’.

 

View this post on Instagram

 

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष फहाद अहमद यांनी फेब्रुवारीमध्ये स्वरा भास्करसोबत लग्नगाठ बांधली होती. अभिनेत्रीने ही बातमी तिच्या चाहत्यांसोबत इंस्टाग्रामवर शेअर केली हाेती, ज्यामुळे स्वराच्या लग्नाची खूप चर्चा झाली. कारण, हिंदू आणि मुस्लीम या दोन्ही धर्माच्या रितीरिवाजांनुसार त्यांनी लग्न केले हाेते.(bollywood actress swara bhasker revealed her sopuse name share post )

हे देखील वाचा