Saturday, June 15, 2024

‘द डायरी ऑफ वेस्ट बंगालचा’ ट्रेलर रिलीज होताच पश्चिम बंगालमध्ये उडाली खळबळ, दिग्दर्शकाला पाठवली कायदेशीर नोटीस

सत्य घटनांवर आधारित असलेल्या ‘द डायरी ऑफ वेस्ट बेंगाल’ या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच वादात सापडला आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शकाला पश्चिम बंगालने कायदेशीर नोटीस पाठवली असून चौकशीसाठी बाेलवले आहे. हा चित्रपट पश्चिम बंगालच्या रोहिंग्या मुस्लिमांच्या कट्टरतावादी संघटनेवर आधारित असल्याचं म्हटलं जात आहे.

‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’च्या माध्यमातून पश्चिम बंगालची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप निर्मात्यांवर करण्यात आला आहे. वसीम रिझवी फिल्म्स प्रस्तुत ‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’चे निर्माते जितेंद्र नारायण सिंह आहेत आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी केले आहेत. अशात पश्चिम बंगालमधील AMHERST पोलिस स्टेशनमध्ये सीआरपीसीच्या कलम 41A अंतर्गत एक नोटीस डायरेक्टरला चौकशीसाठी पाठवण्यात आली आहे.

https://twitter.com/ANI/status/1661967063299260417?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1661967063299260417%7Ctwgr%5E0581dc1ad3bdb389903dfa56d0f60fb7c73e5913%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.abplive.com%2Fentertainment%2Fbollywood%2Fthe-diary-of-west-bengal-trailer-in-controversy-after-released-west-bengal-police-sent-a-legal-notice-to-director-sanoj-mishra-2416881

अशाच आता दिग्दर्शक सनोज मिश्रा यांना 30 मे रोजी दुपारी 12 वाजता या प्रकरणासंदर्भात पोलीस ठाण्यात हजर राहावे लागणार आहे. ‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ या चित्रपटाबाबत पश्चिम बंगाल पोलिसांनी आयपीसीच्या कलम 120(बी), 153ए, 501, ​​504, 505, 295ए आणि आयटी कायद्याची कलम 66डी, 84बी नोंदवली आहे. सिनेमॅटोग्राफी कायद्याच्या कलम 7 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आली आहे.

दुसरीकडे, कायदेशीर नोटीस मिळाल्यानंतर, सनोज कुमार मिश्रा यांचे वकील नागेश मिश्रा म्हणाले की, ‘एफआयआर नोंदवण्यात आली आहे आणि आम्ही कायदेशीर लढाई लढू.'(bollywood movie the diary of west bengal trailer in controversy after released west bengal police sent a legal notice to director sanoj mishra )

हे देखील वाचा