Thursday, June 12, 2025
Home टेलिव्हिजन उर्फी जावेदने एका क्षणात पॅपराझींसमाेर बदलले कपडे, व्हिडिओमध्ये पहा जॅकेट कसा बनला सुंदर ड्रेस

उर्फी जावेदने एका क्षणात पॅपराझींसमाेर बदलले कपडे, व्हिडिओमध्ये पहा जॅकेट कसा बनला सुंदर ड्रेस

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद तिच्या फॅशन सेन्ससाठी नेहमीच चर्चेत असते. ती अनेकदा अशा गोष्टींपासून कपडे बनवते आणि परिधान करते, ज्यामुळे लोक आश्चर्यचकित होतात. दरम्यान, तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो खूप चर्चेत आहे. काय आहे नेमके व्हिडिओमध्ये? चला जाणून घेऊया…

उर्फी जावेद (urfi javed) हिचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये उर्फीचे नवे रूप पुन्हा पहायला मिळत आहे. तर झाले असे की, अलीकडेच उर्फी एका रेस्टॉरंटच्या बाहेर स्पॉट झाली. यादरम्यान ती कारमधून बाहेर पडली तेव्हा तिने काळ्या रंगाचे हेवी जॅकेट आणि पॅंट घातला हाेता. तिच्या जॅकेटला दोन्ही बाजूंनी चेन लावलेली होती. यानंतर, तिच्या टीममधील काही लोकांनी तिच्या जॅकेटची चेन उघडताच त्या जॅकेटचे रूपांतर एका सुंदर फुलांच्या ड्रेसमध्ये झाले. तिला या ड्रेसमध्ये पाहून सगळ्यांना खूप आनंद झाला.

उर्फी जावेदचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चाहते सतत या व्हिडिओवर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. अशात एका युजरने लिहिले की, ‘माझा देश बदलत आहे, पुढे जात आहे.’, तर एकाने लिहिले, ‘पहिल्यांदा मला उर्फीचा हा ड्रेस आवडला.’ अशा अनेक कमेंट्स या व्हिडिओवर येत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

उर्फी जावेदने आपल्या करिअरची सुरुवात लोकप्रिय टीव्ही शो ‘टेढ़ी मेढ़ी फॅमिली’मधून केली होती. यानंतर ती ‘चंद्र नंदिनी’, ‘मेरी दुर्गा’ आणि इतर अनेक शोमध्ये दिसली. तिला सर्वाधिक लोकप्रियता करण जोहरच्या बिग बॉस ओटीटी या रिअॅलिटी शोमधून मिळाली. याशिवाय उर्फी जावेद ‘स्प्लिट्सविला’च्या 11व्या सीझनमध्ये एक मिसचीफ मेकर म्हणून दिसली आहे. (bollywood actress urfi javed latest video viral bigg boss ott contestants transforms her jacket into beautiful floral dress watch here)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
धक्कादायक! समीर वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल तर सीबीआयकडून त्याच्याघरी छापेमारी

‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’ मालिकेच्या सेटला आग, याच ठिकाणी झाला होता अभिनेत्री तुनिशा शर्माचा मृत्यू

हे देखील वाचा