Wednesday, July 3, 2024

‘तू डोरेमॉनच्या बहिणीसारखी दिसत आहेस…’, उर्वशीने निळ्या रंगाचे लिपस्टिक लावल्याने युजर्सने दिल्या भन्नाट प्रतिक्रिया

कान्स फिल्म फेस्टिव्हलची सध्या सर्वाधिक चर्चा आहे. फ्रेंच रिव्हिएरा येथे सुरू असलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये जगभरातील स्टार्स आपल्या साैंदर्याने सर्वांचे लक्ष वेधत आहेत. अशात हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्री कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये रेड कार्पेटवर आपली साैंदर्याची जादू दाखवताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला कशी मागे राहिल बरं? मात्र, उर्वशीला तिच्या लूकमुळे ट्रोल करण्यात येत आहे. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेउया…

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये उर्वशी रौतेला (urvashi rautela) हिचा लूक पाहण्यासारखा आहे. तिने रोज एकापेक्षा जास्त पोशाख परिधान करून रेड कार्पेटवर धुमाकूळ घातला आहे, पण तिचा एक लुक पाहून सर्वांना ऐश्वर्या राय बच्चनची आठवण आली. इतकेच नव्हे तर, लोक असेही म्हणू लागले की, उर्वशीने ऐश्वर्याचा लूक कॉपी केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Urvashi Rautela (@urvashirautela)

उर्वशी रौतेलाने कान्स फेस्टिव्हलच्या तिसऱ्या दिवशी रेड कार्पेटवर पांढऱ्या आणि निळ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. या लूकमध्ये उर्वशी ग्लॅमरस दिसत होती. या आउटफिटसह उर्वशीने तिच्या गळ्यात एक जड हिऱ्याचा नेकलेस घातला होता, परंतु लोकांच्या नजरा तिच्या आउटफिटपेक्षा तिच्या ओठांवर जास्त केंद्रित झाल्या. कारण, उर्वशीने या ड्रेससोबत निळ्या रंगाची लिपस्टिक लावली होती, जी तिच्या लुकलाही खूप सूट हाेत होती, पण तिला पाहून लोक म्हणाले की, तिने ऐश्वर्या रायची स्टाईल कॉपी केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Urvashi Rautela (@urvashirautela)

खरे तर, 2017च्या कान्स फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या रायने ऑफ-शोल्डर गाऊन परिधान करून जांभळ्या रंगाचे लिपस्टीक लावले हाेते. या लूकमध्ये ऐश्वर्या राय रेड कार्पेटवर थिरकली. अशात उर्वशी रौतेलाला त्याच लूकमध्ये पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्राेल करत म्हणटले की, तिने अॅशला काॅपी केले.(bollywood actress urvashi rautela brutally trolled for her cannes 2023 red carpet look fans told she copies aishwarya rai style with blue lips )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॉलिवूडमधील ‘या’ जोडप्यांमध्ये अतुट विश्वास; नावं पाहून तुम्हीही म्हणाल ‘जोडा असावा तर असा’

रेल्वेत मराठी भाषेची होणारी मुस्कटदाबी पाहून मराठी अभिनेत्याने व्हिडिओ पोस्ट करत व्यक्त केला संताप

हे देखील वाचा