देशभरात होळी साजरी केली गेली. सामन्य माणूसच नव्हे तर सेलेब्रिटींनी देखील होळीची मज्जा लुटली. काहींनी कुटुंबीयासोबत तर काहींनी मित्र मैत्रिणींसोबत होळी साजरी केली. पण या होळीत काही कलाकारांचा हटके अंदाज दिसून आला. तो म्हणजे ढोल वर बसून केलेला डान्स. यामध्ये सौंदर्या शर्मा, उर्वशी रौतेला आणि शर्लिन चोप्रा यांसारख्या स्टार्सची नावे आहेत.पाहा होळीचे खास व्हिडिओ.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी होळीमध्ये टीव्ही आणि फिल्म स्टार्सनी खूप धमाल केली. एकमेकांना रंग लावतांना, पिचकारी खेळताना आणि धमाल करताना अनेक स्टार्सचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. यातील सर्वात गंमत अशी आहे की ज्यामध्ये काही अभिनेत्री ढोलवर बसूनच नाचू लागल्या. यामध्ये सौंदर्या शर्मा, उर्वशी रौतेला आणि शर्लिन चोप्रा यांसारख्या स्टार्सची नावे आहेत.
होळी पार्टीत अभिनेत्री शर्लिन चोप्राचा वेगळा अवतार पाहायला मिळाला. पार्टीतील सर्वजण एकमेकांवर रंगांचा वर्षाव करत असताना शर्लिन ढोलवर बसली होती. ढोल वादक ढोल वाजवत असताना शर्लिन चक्क ढोलवर जाऊन बसली होती. आणि तिने ढोल वर बसून डान्स केला. रंगात रंगलेल्या शर्लिनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
उर्वशी रौतेला देखील ढोलवर नाचण्याच्या ट्रेंडमध्ये सामील आहे. होळीच्या पार्टीत तिनेही ढोलवर बसून भांगडा केला. नंतर उर्वशीने स्वतः तिच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.
View this post on Instagram
बिग बॉस फेम सौंदर्या शर्मा नेहमीच तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते. तसेच साजिद खानसोबत ती रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधान आले होते. सौंदर्याची हा व्हिडिओ चाहत्यांना खुप आवडत आहे.
View this post on Instagram
अशा प्रकारे अभिनेत्रींनी अनोख्या पद्धतीने होळीचा आनंद लुटला. (bollywood-actress-urvashi-rautela-sherlyn-chopra-and-soundarya-sharma-holi-dance-dhol-viral-video)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रसिद्ध अभिनेत्रीला पत्र लिहित चाहता म्हाणाला, ‘जर तू माझ्याशी लग्न केलं नाहीस तर मी तुझ्या….,’
धक्कादायक! अभिनेत्रीला प्रियकराकडून बेदम मारहाण, ओळखणे झाले कठीण; जाणून घ्या नेमके काय आहे प्रकरण
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रसिद्ध अभिनेत्रीला पत्र लिहित चाहता म्हाणाला, ‘जर तू माझ्याशी लग्न केलं नाहीस तर मी तुझ्या….,’
धक्कादायक! अभिनेत्रीला प्रियकराकडून बेदम मारहाण, ओळखणे झाले कठीण; जाणून घ्या नेमके काय आहे प्रकरण