बाॅलिवूडला ‘ग्रेट ग्रैंड मस्ती’, ‘हेट स्टोरी 4′,’पागलपंती’,’वर्जिन भानुप्रिया’ यासारखे दमदार चित्रपट देणारी उर्वशी रौतेला सध्या एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी उत्तराखंडमध्ये गेली आहे. जयहरिखल येथे आत्याच्या मुलाच्या लग्न समारंभात पोहोचलेल्या उर्वशीचे साेशल मीडियावर तुफान फाेटाे व्हायरल हाेत आहेत.
बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (urvashi rautela), तिच्या आत्याच्या मुलाच्या लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी उत्तराखंडमध्ये गेली आहे. येथे चाहत्यांच्या गर्दीने उर्वशीला घेरले. उर्वशीनेही चाहत्यांना निराश केले नाही आणि त्यांच्यासोबत सेल्फी आणि फाेटाे काढलेत. लग्नाच्या ठिकाणी झालेल्या संपूर्ण विधीदरम्यान उर्वशी तिची आई मीरा रौतेला आणि वडील मनवर सिंग यांच्यासोबत उपस्थित होती.
येथे एका बैठकीत उर्वशीने सांगितले की, “2013 मध्ये तिचा पहिला हिंदी चित्रपट ‘सिंग साब द ग्रेट’ होता. यानंतर ‘सनम रे’, ‘पागलपंती’, ‘हेट स्टोरी 4’ या चित्रपटासाठी तिचे सर्वत्र कौतुक झाले. अभिनेत्री सध्या दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. सूरज प्रॉडक्शनच्या बॅनरखाली सुसी गणेशन दिग्दर्शित ‘ऐ दिल है ग्रे’मध्ये ती विनीत सिंग आणि अक्षय ओबेरॉय यांच्यासोबत दिसणार आहे.” आपल्या आगामी चित्रपटांबद्दल माहिती देताना अभिनेत्री म्हणाली की, “मोहन भारद्वाज दिग्दर्शित ‘काला गुलाब’ हा चित्रपट मी साईन केला आहे. हा द्विभाषिक चित्रपट असून, हिंदी आणि तेलुगू अशा दोन्ही भाषांमध्ये चित्रित करण्यात आला आहे.”
उर्वशी सांगते की, “तिच्या ‘बॉस पार्टी’ या गाण्याला दोन कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तिच्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे. उर्वशी रौतेला आणि अभिनेता चिरंजीवीचे आयटम नंबर गाणं 22 नोव्हेंबर रोजी रिलीज झाले. हे गाणे वॉल्टेअर वीरैया या चित्रपटातील आहे. उर्वशीने पुढे सांगते की, “या चित्रपटाद्वारे तिने तेलुगू चित्रपटांमध्ये पदार्पण केले आहे.”
मेगास्टार चिरंजीवी आणि दिग्दर्शक बॉबी कोल्ली यांचा वॉल्टेअर वीरैया हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. यात रवी तेजा आणि श्रुती हासन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. (bollywood actress urvashi reached brother wedding ceremony uttarakhand)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
साडीत अधिक खुलले ऐश्वर्या नारकर यांचे सौंदर्य, पाहा त्यांचे साडीमधील घायाळ करणारे फोटो
छान किती दिसते फुलपाखरु, पाहा रकुलची फाेटाे गॅलरी