साडीत अधिक खुलले ऐश्वर्या नारकर यांचे सौंदर्य, पाहा त्यांचे साडीमधील घायाळ करणारे फोटो


मराठी मनोरंजन विश्वातली ‘एव्हरग्रीन अभिनेत्री’ म्हणजेच ऐश्वर्या नारकर. त्यांचे सौंदर्य आणि निरागस चेहरा नेहमी सर्वाना आकर्षित करतो.

अतिशय सालस असणाऱ्या ऐश्वर्या एक उत्तम अभिनेत्री आहेत. मागील दोन दशकांपासून ऐश्वर्या त्यांच्या अभिनयाने आपल्या सर्वांचे मनोरंजन करत आहे. केवळ मराठीच नव्हे तर हिंदी कलाविश्वात देखील ऐश्वर्या यांनी त्यांच्या अभिनयाने सर्वाना आपलेसे केले आहे.

सध्या ऐश्वर्या एका वेगळ्याच गोष्टींमुळे चर्चेत आहे. त्यांनी नुकतेच साडीमध्ये एक फोटोशूट केले आहे, आणि त्यातले काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.

ऐश्वर्या आणि त्यांचे साडी प्रेम तर सर्वश्रुत आहे. त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटची चक्कर मारली तर त्यांचे साड्यांमधील असंख्य फोटो आपल्याला दिसतील.

सध्या त्यांच्या फोटोंमुळे ऐश्वर्या विशेष चर्चेत आल्या आहेत. सध्या खूपच लोकप्रिय असणाऱ्या खण साड्यांमध्ये त्यांनी फोटोशूट केले आहे. ऐश्वर्या नेहमीच त्यांच्या प्रत्येक भूमिकांना योग्य न्याय देतात.

ऐश्वर्या यांना पाहून कोणीच म्हणणार नाही की, त्यांना एक मोठा मुलगा आहे. इतक्या सुंदर त्या आजही दिसतात. सध्या ‘श्रीमंता घरची सून’ या मालिकेत ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर ही जोडी झळकत आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.