Thursday, April 17, 2025
Home नक्की वाचा ‘विवाह’ फेम पूनम म्हणजेच अभिनेत्री अमृता राव एका जाहिरातीसाठी घेते एवढे पैसे; करोडो संपत्तीची आहे मालकीण

‘विवाह’ फेम पूनम म्हणजेच अभिनेत्री अमृता राव एका जाहिरातीसाठी घेते एवढे पैसे; करोडो संपत्तीची आहे मालकीण

बॉलीवूडमधील असे अनेक कलाकार आहेत ज्यांची एखाद्या चित्रपटातील भूमिकेमुळे एक वेगळी ओळख तयार झाली आहे. मग त्या कलाकाराने इतर कितीही वेगेवगळ्या भूमिका केल्या तरी, ती भूमिका चाहत्यांच्या स्मरणात राहते. ती एक भूमिका त्या कलाकाराचे आयुष्य बदलून टाकते. असच एक चित्रपट 2006 साली आला होता तो म्हणजे विवाह. सूरज बडजात्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांची खुप  पसंती मिळाली. या अभिनेता शाहीद कपूर आणि अभिनेत्री अमृता राव यांची जोडी बघायला मिळाली. अमृता राव हिने पूनम ही व्यक्तिरेखा साकारली होती, जी आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. ही अभिनेत्री आता अभिनयाच्या दुनियेत तितकी सक्रिय नाही, पण तरीही ती करोडोंची मालकीण आहे. आता तुम्हांला प्रश्न पडला असेल की, कस काय? तर चला तर आपण जाणून घेऊ या…या अभिनेत्रीच्या व्यावसायिक जीवनाबद्दल
अभिनेत्री अमृता राव (Actress Amruta Rao) हिचा जन्म 7 जून रोजी मुंबईत झाला. शालेय शिक्षणानंतर, अमृता मानसशास्त्रात पदवी घेत होती परंतु मॉडेलिंगमधील करियरमुळे तिने तिचे शिक्षण अर्धवट सोडले.
मॉडेलिंगच्या दुनियेत नाव कमावल्यानंतर तिने 2002 मध्ये ‘अब के बरस’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर तिने  ‘इश्क विश्क’, ‘मैं हूं ना’, ‘विवाह’, ‘मस्ती’ यासारखे चित्रपट केले. त्यानंतर तिचे करिअर बॉलिवूडमध्ये सुरळीतपणे सुरू झाले.
अमृताने नंतर बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपट केले, पण तिला पाहिजे तसे यश मिळू शकले नाही. साऊथ चित्रपटांसोबतच अमृताने काही रिएलिटी शो देखील केले.
वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर अमृताने आरजे अनमोल याला बराच काळ डेट केले. यानंतर दोघांनीही नाते पुढे नेत 15 मे 2016 रोजी लग्न केले. त्यांना एक मुलगा आहे. ज्याच नाव वीर आहे.
अमृता रावने भलेही अभिनयाच्या जगापासून दुर गेली असेल तरी, ती अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. अलीकडेच ती लव्हवरील पुस्तक घेऊन आली होती, जे रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी लॉन्च केले होते.

 

तसेच  मॉडेलिंग असाइनमेंट आणि जाहिरातींमधून अमृता खूप पैसे कमावते. मिडिया रिपोर्टनुसार तिची एकूण संपत्ती 20 कोटी रुपये आहे. ती जाहिराती आणि मॉडेलिंगसाठी बक्कळ पैसे घेते. (bollywood-actress-vivah-movie-fem-amrita-rao-personal-and-professional-life)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आजारी असलेल्या सुलोचना दीदींच्या मदतीसाठी धावले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ब्रेकिंग! प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक सतीश कौशिक काळाच्या पडद्याआड, बॉलिवूडवर शोककळा

हे देखील वाचा