वैजयंती माला यांना नव्हते करायचे चित्रपटात काम, एका डान्स परफॉर्मन्सने बदलले आयुष्य


दिवंगत अभिनेत्री वैजयंतीमाला यांनी वयाच्या १६व्या वर्षांपासून अभिनयाला सुरुवात केली होती. भरतनाट्यम नृत्य असो किंवा कर्नाटकी संगीत या दोन्हीमध्ये पण वैजयंतीमाला यांनी खूप नाव कमावले. हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं खास स्थान निर्माण करणार्‍या दिग्गज अभिनेत्री वैजयंतीमाला यांना कधीच अभिनेत्री व्हायचं नव्हतं. एक काळ होता, जेव्हा मोठ्या घरातील लोकांना नाटक, आणि सिनेमात काम करायला आवडत नव्हते. वैजयंती या लहानपणापासूनच भरतनाट्यम शिकत होत्या. एवढेच नव्हे, तर अवघ्या साडेचार वर्षांच्या वयात त्यांनी प्रथमच रंगमंचावर परफॉर्मन्स केला होता. एकदा जेव्हा त्या स्टेजवर नाचत होत्या, तेव्हा दिग्दर्शक एम. व्ही. रमन यांनी त्यांना बघितले, तेव्हा एम. व्ही. रमण नव्या चित्रपटासाठी नवीन चेहऱ्याच्या शोधात होते.

रंगमंचावर नाचणाऱ्या वैजयंती माला एम. व्ही. रमण यांना एवढ्या आवडल्या की, चित्रपटाची संकल्पना घेऊन, ते वैजयंती माला यांच्या घरी पोहोचले. वैजयंती मालांच्या आजीला, याची माहिती होताच त्यांनी लगेच नकार दिला. चित्रपटात काम केल्याने वैजयंती यांच्या अभ्यासाचे नुकसान होणार नाही, असे एम. व्ही. रमण यांनी त्यांना स्पष्ट सांगितले. बरीच समजूत घातल्यानंतर, आजी सहमत झाल्या होत्या.

त्यानंतर वैजयंती माला यांनीही मान्यता दिली. या चित्रपटाचे नाव होते ‘वाझकई’, जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा तो खूप नावाजला गेला होता. इतकेच नाही तर, हा चित्रपट इतका गाजला की, तो तेलुगु भाषेतही प्रदर्शित करण्यात आला, त्यातही वैजयंती मालाच होत्या. या चित्रपटात काम करण्यासाठी, त्यांनी आपल्या वडिलांकडून तेलुगु भाषा शिकून घेतली होती.

त्यानंतर ए.व्ही. एम. प्रॉडक्शनने हिंदी भाषेत, हा चित्रपट ‘वैजयंती माला’ समवेत १९५१ मध्ये प्रदर्शित केला. या चित्रपटाचे नाव ‘बहार’ ठेवण्यात आले होते. वैजयंती माला यांचा ‘बहार’ हा चित्रपट त्या वर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये सहावा स्थानावर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. या चित्रपटात वैजयंती मालाच्या नृत्याने संपूर्ण भारताला वेड लावले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रेमासाठी काहीही! प्रेम मिळवण्यासाठी ‘या’ कलाकारांनी चित्रपटात हद्दच केली पार, सुनील शेट्टीही यादीत सामील

-बॉलिवूडमधील ‘या’ प्रसिद्ध जोडप्यांना लग्नानंतर झाले नाही मूल, दिलीप कुमार अन् सायरा बानोचाही समावेश


Leave A Reply

Your email address will not be published.