सध्या बॉलिवूड जगतात अनेक अभिनेत्री मातृत्वाचा आनंद लुटताना दिसत आहेत. अभिनेत्री सध्या आई होण्यासाठी उत्सुक असतानाच हिंदी चित्रपट जगतात काही अशाही अभिनेत्री आहेत ज्यांनी विवाहित असूनही बाळाला जन्म देणे मात्र टाळले आहे. कोणत्या आहेत त्या अभिनेत्री चला जाणून घेऊ.
पारुल चौहान –
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्री पारुल चौहानने आपल्याला मुलं नको असल्याची कबुली दिली आहे. तिच्यासोबत तिच्या पतीनेही याच गोष्टीला संमती दर्शवली आहे. तिच्या निर्णयाबाबत माहिती देताना ती म्हणाली, “मला मुलं नको आहे आणि मी या निर्णयाबाबत अगदी स्पष्ट आहे. या विषयावर माझे पती आणि माझे मत समान आहे. मला मुलं आवडतात, पण ती दुसऱ्याची असतील तरच. माझी सासरची मंडळीही याच विचाराची आहे.”
कविता कौशिक –
‘एफआयआर’ मालिकेची मुख्य कलाकार कविता कौशिक हिनेही मुलं न होण्याबाबत अनेकदा आपले मत मांडले आहे. कविताने एकदा सांगितले होते की “तिने आणि तिच्या पतीने मिळून ठरवले होते की त्यांना मुले होऊ द्यायची नाहीत. कारण मला मुलावर अन्याय करायचा नाही. मी 40 व्या वर्षी आई झाले, तर तोपर्यंत आम्हाला म्हातारपण आले असेल आणि माझे मूल 20 वर्षांचे होईल. त्यामुळे २० वर्षाच्या मुलावर वृद्ध पालकांची जबाबदारी मला द्यायची नाही.”
आयशा जुल्का-
अभिनेत्री आयशा झुल्कानेही तिला मुलं नको असल्याचं स्पष्ट केलं होतं. ती एकदा म्हणाली होती की, “मला मुले नाहीत कारण माझी इच्छा नव्हती. मी माझ्या कामावर आणि सामाजिक जीवनात बराच वेळ घालवते, त्यामुळेच मी हा निर्णय घेतला. माझा निर्णय संपूर्ण कुटुंबाला आवडला याचा मला आनंद आहे.”
रुबिना दिलेक –
बिग बॉस 14 ची विजेती रुबिना दिलीकने देखील तिला अद्याप मुले नको असल्याचे सांगितले होते. “माझ्या मते पालक होणे ही एक मोठी जबाबदारी आहे आणि जोपर्यंत तुम्ही एकमेकांना नीट समजून घेत नाही तोपर्यंत तुम्ही ते करू नये. मुलाला या जगात आणणे ही तुमच्या आयुष्यातील मोठी जबाबदारी आहे आणि ती दोन्ही पालकांनी नीट समजून घेतली पाहिजे. पण भविष्यात माझा निर्णय बदलू शकतो” असे तिने सांगितले होते.
विद्या बालन –
विद्या बालनचे लग्न सिद्धार्थ रॉय कपूरसोबत होऊन बरीच वर्षे झाली आहेत. तिच्या प्रेग्नेंसीच्या बातम्या वारंवार येत असतात, पण ती म्हणते की तिच्याकडे मुलांसाठी वेळ नाही. “माझ्याकडे मुलासाठी वेळ नाही. मी केलेला प्रत्येक चित्रपट माझ्यासाठी नवीन बाळासारखेच आहे, त्यामुळे माझ्याकडे 20 मुले आहेत. सध्या मी माझ्या कामावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करत आहे.” असे मत विद्या बालनने याबद्दल व्यक्त केले होते.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा