सध्या देशभरात विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मिर फाइल्स’ चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या चित्रपटाने देशभरात प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे.चित्रपटाने कमाईचे नवनवे रेकॉर्ड प्रस्थापित केले आहेत. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी पासूनच हा चित्रपट सगळीकडे चर्चेत आहे. देशभरातील प्रेक्षकांनी चित्रपटगृहात गर्दी केली आहे. तसेच या चित्रपटाने देशाच्या राजकीय क्षेत्रातही खळबळ माजवली आहे. चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारे अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्यांनी या चित्रपटानंतर त्यांच्या आयुष्यात झालेले बदल अधोरेखित केले आहेत.
‘द काश्मिर फाइल्स’ चित्रपटानंतर अभिनेते अनुपम खेर यांच्याबद्दलच्या अनेक बातम्या सध्या चर्चेत आहेत. चित्रपटात अनुपम खेर यांनी काश्मिरी पंडिताची भूमिका साकारली आहे. त्यांच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. सध्या अनुपम खेर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. ज्यामध्ये अनुपम खेर यांच्या घरी आलेले काही पंडित आणि साधु त्यांच्या डोक्यावर फुले वाहताना आणि मंत्रोच्चार करताना दिसत आहेत. ज्या प्रमाणे एखाद्या देव देवतांचे पुजन केले जाते त्याचप्रमाणे अनुपम खेर यांचे पुजन होताना या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे.
हा व्हिडिओ अनुपम खेर यांनी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंवरुन शेअर केला आहे. ज्यासोबत त्यांनी “गेले काही दिवस दर चार पाच दिवसांनी माझ्या घरात हे दृश्य पाहायला मिळत आहे. माझ्या घरी काही साधु पंडित येतात आणि माझी पुजा करुन मला आशिर्वाद देऊन काहीही न मागता निघुन जातात,” असा कॅप्शन दिला आहे. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. दरम्यान द काश्मिर फाइल्स चित्रपटाची कथा १९९० च्या दरम्यान काश्मिरमध्ये झालेल्या काश्मिरी पंडितांच्या अन्याय अत्याचारावर आधारित आहे. चित्रपटात अनुपम खेर यांच्यासोबत पल्लवी जोशी, चिन्मय मांडलेकर यांनी काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –