Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

ब्रेकअपनंतरही ‘या’ अभिनेत्रींने केले एक्स बॉयफ्रेंडसोबत चित्रपटात काम, पाहा यादी

बॉलिवूडमध्ये रोज अफेअर आणि ब्रेकअपच्या बातम्या ऐकायला मिळतात. कधी काही स्टार्सची लव्हस्टोरी सुपर-डुपर हिट ठरते, तर कधी काहींचे नाते पत्याच्या घरासारखे तुटते. बी-टाऊनमध्ये अशी अनेक जोडपी आहेत जी ‘रब ने बना दी जोडी’ सारखी दिसत होती, परंतु या जोडप्यांचा शेवट खूपच आश्चर्यकारक होता. विशेष म्हणजे हे नाते इतके तुटल्यानंतरही या सेलिब्रिटींनी त्यांच्या कामावर त्याचा परिणाम होऊ दिला नाही. ब्रेकअपनंतरही एकमेकांसोबत काम करणाऱ्यामध्ये रणबीर कपूर ते श्रद्धा कपूर या सारख्या दमदार कलाकारांचा समावेश आहे. या बॉलीवूड जोडप्यांनी ब्रेकअपनंतरही त्यांच्या एक्स गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडसोबत काम केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर हे त्यांच्या एक्ससोबत काम करणाऱ्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांच्या अफेअरच्या बातम्याही खूप चर्तेत हाेत्या. रणबीर आणि दीपिका हे बी-टाऊनमधील सर्वात सुंदर आणि रोमँटिक जोडप्यांपैकी एक मानले जात होते, परंतु त्यांच्या ब्रेकअपमुळे त्यांच्या चाहत्यांना माेठा धक्का बसला. ब्रेकअपनंतर दोघेही वेगळे झाले, पण त्याचा त्यांच्या व्यावसायिक जीवनावर त्यांनी काहीही परिणाम होऊ दिला नाही. ब्रेकअपनंतरही दोघांनी ‘ये जवानी है दिवानी’ आणि ‘तमाशा’ या चित्रपटात एकत्र काम केले. दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

कॅटरिना कैफ बॉलीवूडमधील लाेकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्रीने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. दीपिकासोबत ब्रेकअप झाल्यानंतर रणबीरचे नाव कॅटरिनासोबत जोडले जाऊ लागले. त्यांच्या अफेअरच्या बातम्या खूप चर्चेत होत्या, पण दोघांचे हे नाते फार काळ टिकू शकले नाही. ब्रेकअपनंतरही रणबीर आणि कॅटरिनाने ‘जग्गा जासूस’ चित्रपटात एकत्र काम केले होते. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष कमाल दाखवू शकला नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. ‘आशिकी 2’ या चित्रपटातून श्रद्धाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. चित्रपटाचा नायक आदित्य रॉय कपूरसोबतच्या तिच्या नात्याच्या बातम्या खूप चर्चेत होत्या, पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि दोघांचे ब्रेकअप झाले. ब्रेकअपनंतरही या स्टार्सनी ‘ओके जानू’ चित्रपटात एकत्र काम केले आहे.( bollywood actress worked with their ex from deepika padukone actress shraddha kapoor actress katrina kaif)

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पंगा गर्ल कंगना राणौतने आमिर खानवर साधला निशाणा, अभिनेत्याला म्हटले ‘बिचारा’

धक्कादायक! रुबीना दिलैकची प्रकृती गंभीर, सुजलेले डोळे अन् ओठ आणि….

हे देखील वाचा