Wednesday, July 3, 2024

तब्बल चार वेळा लग्न करून ‘ही’ अभिनेत्री आलेली चर्चेत, सध्या पाकिस्तानमध्ये ‘असे’ काढते आयुष्य

आजपर्यंत आपण बॉलिवूड अभिनेते विनोद मेहरा ( vinod mehra )आणि किशोर कुमार ( kishore kumar )यांच्या चार चार लग्नाच्या बातम्या तर ऐकल्याच असतील. पण या सगळ्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री देखील मागे नाहीत. आज आपण अशाच अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत. ती अभिनेत्री म्हणजे पाकिस्तानी अभिनेत्री जेबा बख्तियार (zeba bakhtiar ). हिने 1991 मध्ये रणधीर कपूर ( randhir kapoor )निर्मित ‘हिना’ ( Hina ) या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. या चित्रपटामुळे तिला अमाप प्रसिद्धी मिळाली होती.

जेबा बख्तियार ही एक पाकिस्तानी अभिनेत्री म्हणून ओळखले जाते जिने ‘हिना’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी मिळवली होती. जेबाचे वडिल पाकिस्तानचे मोठे राजकारनी असून तिची आई हंगरी या गावात राहणारी होती. या अभिनेत्रीचे वैयक्तीक आयुष्य चित्रपटासारखेच सुंदर होते. तिने एकून 4 लग्न केले होते. तिचे पहिले लग्न पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या सलमान वल्लियानीसोबत झाले होते. मात्र, हे लग्न फार काळ टिकला नाही आणि लवकरच त्यांचा घटस्फोट झाला.

यानंतर जेबाने दुसरे लग्न भारतीय कलाकार जावेद जाफरी (javed jaffrey) या बॉलिवूड अभिनेत्यासोबत केले होते. यामुळे दोघे चांगलेच चर्चेत आले होते. मात्र, यांच्या नशिबात वेगळे होणेच लिहिले होते, आणि काही दिवसांनी जेबा आणि जावेद जाफरीने घटस्फोट घेतला आणि दोघांचे रस्ते वेगळे झाले.

यानंतरही जेबाने तिसऱ्यांदा भारतीय गायक अदनान सामी(Adnan Sami) याच्याशी विवाह केला, आणि यानंतर यांच्या घरात एका गोंडस मुलाचा जन्म झाला होता. मात्र इथेही जेबाच्या नशिबाने साथ दिली नाही आणि अदनान सामीसोबतही घटस्फोट झाला.

माध्यमातील वृत्तानुसार, जेबा बख्तियारने माघार घेतली नाही तिने पुन्हा एकदा स्वत:चे नशिब आजमवण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी तिला नशिबाने साथ दिली आणि तिने चौथ्यांदा पाकीस्तानी सोहेल खान याच्या सोबत विवाह केला आहे. आता ती सोहेल खान सोबत सुखी संसारात पाकीस्तानमध्येच स्थाइक झाली आहे. मात्र आजही तिला तिच्या अभिनयामुळे ओळखले जाते.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा
‘ब्रह्मास्त्र’चे दोन दिवसाचे कलेक्शन पाहून बरळली कंगना; म्हणाली, ‘मला करणचा इंटरव्यू घ्यायचा आहे’
लाखो तरुणांची धडकन असणाऱ्या ऋता दुर्गुळेने अशी केली करिअरला सुरुवात, जाणून घ्या तिचा प्रवास
लग्नावरून उडालाय श्वेता तिवारीचा विश्वास; म्हणाली, ‘लेकीलाही सांगते नको करू बाई लग्न’

हे देखील वाचा