Thursday, April 3, 2025
Home बॉलीवूड सत्तरचे दशक गाजवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रीला सोसाव्या लागल्या वेदना; पतीने भर पार्टीत केली मारहाण, कायमचा गमवाला एक डोळा

सत्तरचे दशक गाजवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रीला सोसाव्या लागल्या वेदना; पतीने भर पार्टीत केली मारहाण, कायमचा गमवाला एक डोळा

बॉलिवूडला ‘स्वप्नांची चंदेरी दुनिया’ असं म्हटलं जात नाही… अनेकजण आपले नशीब आजमावण्यासाठी इथे येतात. ७० च्या दशकातही मनोरंजनाच्या झगमगाटी दुनियेत अनेक कलाकारांनी पाऊल ठेवत आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली होती. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे ‘झीनत अमान’. झीनत अमान यांना आता कोणत्याची परिचयाची आवश्यकता नाही. कारण त्यांचं नाव जरी ऐकलं, तरी तिचे चित्रपट, गाणी आपसुकच प्रेक्षकांच्या मुखात येतात. ७० ते ८० च्या दशकात झीनत यांनी आपल्या ग्लॅमरस आणि प्रतिभेने बॉलिवूडमध्ये अशी धमाल केली की, प्रत्येकजण त्यांचा चाहता बनला होता. त्या काळात एकीकडे जवळपास सर्वच अभिनेत्री पारंपारिक अंदाजात दिसायच्या आणि चित्रपटातही साडीत दिसायच्या, तेव्हा दुसरीकडे मात्र झीनत यांनी आपल्या वेस्टर्न अंदाजाने चित्रपटसृष्टीला वेड लावले होते. मात्र, त्यांच्या आयुष्यात अनेक वेदनादायी घटना घडल्या. त्यांच्यावर टाकलेली एक नजर…

झीनत यांचा जन्म १९ नोव्हेंबर, १९५१ मध्ये एका पठाण कुटुंबात मुंबई येथे झाला होता. अनेक मुलींप्रमाणे त्यांनाही सुरुवातीपासूनच मॉडेलिंगमध्ये आपली कारकीर्द घडवायची होती, त्यासाठी त्यांनी ब्यूटी कॉन्टेस्टमध्ये भाग घेतला होता. १९७० मध्ये त्या फेमिना मिस इंडिया आणि मिस इंडिया पॅसिफिक इंटरनॅशनल जिंकण्यात यशस्वी ठरल्या. याचदरम्यान त्यांना ‘स्वप्नांची नगरी’ म्हणजेच बॉलिवूडमधून ऑफर मिळाली. तसं तर त्यांचा १९७० मध्ये आलेला ‘द इविल विदिन’ हा पहिला चित्रपट होता. परंतु त्यांना बॉलिवूडमध्ये खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली, ती सुपरस्टार देव आनंद यांच्या सन १९७१ साली आलेल्या ‘हरे राम हरे कृष्णा’ या चित्रपटाने. याच दरम्यान त्यांचे नाव अभिनेता संजय खान यांच्याशी जोडले गेले आणि आपल्या वैयक्तित आयुष्यामुळे त्या माध्यमांमध्ये चर्चेत येऊ लागल्या.

संजय खान यांचे आधीपासूनच लग्न झालेले होते. इतकेच नव्हे, तर त्यांना मुलंबाळंही होती. असे असूनही ते झीनत यांच्यासोबत रिलेशनशीपमध्ये होते. असे म्हटले जाते की, झीनत आणि संजय यांनी लग्नही केले होते. परंतु दोघांमधील भांडण वाढले होते.

माध्यमांतील वृत्तांनुसार, एका पार्टीमध्ये सर्वांसमोर संजय खान यांनी झीनत अमान यांना जोरदार मारहाण होते. त्यामध्ये झीनत यांच्या डोळ्याला जबर दुखापत झाली होती. यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले होते. त्यांचा एक डोळा कायमसाठी खराब झाला.

सन १९८५ मध्ये झीनत अमान यांनी मजहर खान यांच्याशी दुसरे लग्न केले. त्यातही त्यांना दु:खच मिळाले. मजहरही त्यांना मारायचे, त्यामुळे कंटाळून त्यांनी मजहर यांच्याकडून घटस्फोट घेतला आणि मुलाचा सांभाळ केला.

झीनत यांनी बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यामध्ये ‘धरम वीर’, ‘डॉन’, ‘इन्साफ का तराजू’, ‘कुर्बानी’, ‘दोस्ताना’, ‘अलिबाबा और चालीस चोर’, ‘शालीमार’, ‘गोलमाल’ अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. यासोबतच त्यांनी बॉलिवूडचे सुपरस्टार राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, देव आनंद अशा अभिनेत्यांसोबत काम केले.

त्यांनी शेवटचे सन २०१९ मध्ये आलेल्या ‘पानिपत’ या चित्रपटात काम केले होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

तीन लग्न होऊनही आयुष्यभर ‘ती’ एकटीच राहिली, दोन मुले आता बॉलिवूडमध्ये सुपरस्टार; नाव वाचून धक्का बसेल

धर्मेंद्र यांनी घातलेला ‘तो’ राडा, ज्यामुळे मोडले होते जितेंद्र आणि हेमा मालिनीचे लग्न, वाचा खास लव्हस्टोरी

हे देखील वाचा