Friday, June 20, 2025
Home कॅलेंडर बॉलिवूडमधील ‘या’ नायिकांनी पितापुत्रांसोबत केलाय ‘ऑनस्क्रिन रोमान्स’; जया प्रदा, श्रीदेवी यांचेही यादीत नाव

बॉलिवूडमधील ‘या’ नायिकांनी पितापुत्रांसोबत केलाय ‘ऑनस्क्रिन रोमान्स’; जया प्रदा, श्रीदेवी यांचेही यादीत नाव

बॉलिवूडमध्ये अजूनही नायक आणि नायिकेच्या भूमिकेला जास्त प्रधान्य दिले जाते. नायक आणि नायिकेची केमिस्ट्री प्रेक्षकांना पसंत पडावी, यासाठी चर्चेत असलेल्या कलाकारांना घेतले जाते.

शाहरुख-काजल, सलमान – ऐश्वर्या, सलमान – कतरीना, शाहरुख – दीपिका, दीपिका – रणवीर, सलमान-माधुरी,  अनिल – माधुरी, अशा अनेक जोड्या आपण चित्रपटांमध्ये पाहिल्या आहेत.  आणि प्रेक्षकांच्या त्या पसंतीस देखील उतरल्या आहेत. परंत, काही अभिनेत्री आहेत ज्यांनी नायिका म्हणून पिता-पुत्र अशा दोघांसमवेत स्क्रीन शेअर केली आहे. चला तर मग या अभिनेत्री कोण आहेत ते जाणून घेऊयात.

१. डिंपल खन्ना-कपाडिया

डिंपल कपाडिया या दिवंगत अभिनेते सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या पत्नी आहेत. डिंपल कपाडिया यांचीदेखील अभिनेत्री म्हणून कारकीर्द मोठी आहे. यातच त्यांनी दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांच्यासोबत ‘खून का कर्ज’, ‘बटवारा’, ‘लेकिन’ या सारख्या सिनेमात नायिकेची भूमिका साकारली. तर २००१ साली आलेल्या ‘दिल चाहता है’ मध्ये त्यांनी विनोद खन्ना यांचे सुपुत्र अक्षय खन्ना यांच्या सोबत नायिका म्हणून स्क्रीन शेअर केली होती.

२. जया प्रदा

एकेकाळच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री जया प्रदा यांनी अनेक सुपरस्टार नायकांसोबत मुख्य भूमिकेत स्क्रीन शेअर केली होती. जया प्रदा यांनी बॉलिवूडचे हि-मॅन धर्मेंद्र यांच्यासोबत ‘गंगा तेरे देश में’, ‘शहजादे’, ‘फरीष्ते’ यांसारख्या सिनेमांमध्ये ऑनस्क्रीन रोमान्स केला होता. याच सोबत कालांतराने त्यांनी धर्मेंद्र यांचे सुपुत्र अभिनेते सनी देओल यांच्यासोबत ‘विरता’ या सुपरहिट सिनेमामध्ये स्क्रीन शेअर केली होती.

३. माधुरी दीक्षित

बॉलिवूडच्या धकधक गर्लबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे. नव्वदीच्या दशकात तिने जवळ जवळ प्रत्येक सुप्रसिद्ध नायकांसोबत काम केलं आहे. यात तिने दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांच्या सोबत ‘दयावान’ सिनेमामध्ये मुख्य भूमिका साकारली होती तर त्यांचे पुत्र अक्षय खन्ना यांच्यासोबत तिने ‘मोहब्बत’ या सिनेमामध्ये स्क्रीन शेअर केली होती.

४. हेमा मालिनी

बॉलिवूडच्या एकेकाळच्या ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी सुद्धा अनेक सुपरहिट सिनेमे दिलेले आहेत. मोठमोठ्या नायकांसोबत त्याना या काळात काम करण्याची संधी मिळाली होती. यात त्यांनी महान अभिनेते राज कपूर यांच्या सोबत ‘सपनो के सौदागर’ या सिनेमामध्ये रोमान्स केला होता तर पुढील काळात त्यांनी त्यांचे पुत्र दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या सोबत ‘एक चादर मैली सी’ आणि अशा इतर अनेक सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे.

५. श्रीदेवी

बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार म्हणून नाव कमावलेल्या श्री देवी यांच्याबद्दल काय बोलावं. त्यांच्या नावावरच प्रेक्षक तिकीट बारीवर गर्दी करत असत. श्री देवी यांनी सुद्धा एक पिता पुत्राच्या जोडीसोबत काम केलं आहे. श्रीदेवी यांनी बॉलिवूडचे हि-मॅन धर्मेंद्र यांच्यासोबत ‘नाकाबंदी’ या सिनेमात स्क्रीन शेअर केली होती तर त्यांचे सुपुत्र सनी देओल यांच्यासोबत ‘राम अवतार’ या सिनेमामध्ये ऑनस्क्रीन रोमान्स केला होता.

हे देखील वाचा