Saturday, April 12, 2025
Home बॉलीवूड बॉलिवूडच्या या ‘पाच’ अभिनेत्रींनी त्यांच्या लग्नात घातला सर्वात महाग लेहेंगा, किंमत ऐकून होतील डोळे पांढरे

बॉलिवूडच्या या ‘पाच’ अभिनेत्रींनी त्यांच्या लग्नात घातला सर्वात महाग लेहेंगा, किंमत ऐकून होतील डोळे पांढरे

बॉलिवूड म्हटले की सर्व ग्रँड होणार हे तर ठरलेलेच असते. सिनेमे तर आपण बघतो त्यात तर गरीब अभिनेत्याकडे देखील महागडी बाईक दाखवली जाते. इतके ग्रँड सर्व इथे असते. तर कलाकारांच्या खासगी आयुष्यातील समारंभ कोणत्या दर्जाचे ग्रँड असतील हे तर आपल्या विचारांच्या परे आहे. फक्त फोटो आणि काही सेकंदांचे व्हिडिओ पाहूनच आपल्याला अंदाज लावणे देखील कठीण जाते. लग्न हा सामान्य किंवा सेलिब्रिटी प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि संस्मरणीय दिवस असतो. हा दिवस खास आणि भव्य होण्यासाठी प्रत्येक जणं खूपच प्रयत्न करत असतो. हा दिवस ग्रँड होण्यासाठी कलाकार तर पाण्यासारखा पैसे खर्च करतात. लागणीच्या जागेपासून, मेकअपपर्यंत अगदी लहान लहान गोष्टी देखील ग्रँड असतात. अभिनेत्रींचे लेहेंगेच लाखो करोडो रुपयांच्या घरात असतात. हे लेहेंगे डिझाइन कारालाच डिझायनरला अनेक महिन्यांचा काळ लागतो. आज या लेखातून आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील अशा अभिनेत्री सांगणार आहोत, ज्यांच्या लग्नाचा लेहेंगा सर्वात महाग होता.

दीपिका पदुकोण :
बॉलिवूडमधील टॉपची अभिनेत्री असलेल्या दीपिकाने २०१८ साली रणवीर सिंगसोबत अतिशय खासगी समारंभात लगीनगाठ बांधली. तिच्या लग्नाचा लेहेंगा सब्यासाचीने डिझाइन केला होता. लाल रंगाचा एम्ब्रॉयडरी आणि गोटा वर्क असलेल्या तिच्या लेहेंग्याच्या दुपट्ट्यावर ‘सदा सौभाग्यवती भव:’ असे लिहिले गेले होते. इच्छा हा लेहेंगा खूपच व्हायरल झाला होता. अनेक सामान्य मुलींनी देखील अशाच लेहेंग्याला त्यांच्या लग्नात पसंती दिली. या लेहेंग्याची किंमत जवळपास ९७ लाख इतकी होती.

अनुष्का शर्मा :
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचे लग्न देखील तुफान गाजले. २०१७ साली खासगी समारंभात यांनी लग्न केले. अनुष्काने तिच्या लग्नात गुलाबी रंगाचा अतिशय सुंदर लेहेंगा घातला होता. अनुष्काचा लेहेंगा देखील सब्यसाचीनेच डिझाइन केला होता. ६७ लोकांना जवळपास ३२ दिवसात हा लेहेंगा तयार केला. याची किंमत ९५ लाख होती.

ऐश्वर्या राय बच्चन :
विश्वसुंदरी असणाऱ्या ऐश्वर्या रायने २००७ साली अभिषेक बच्चनसोबत लग्न केले. ऐश्वर्याच्या लग्नाची साडी डिझायनर नीता लुल्लाने डिझाइन केली होती. ऐश्वर्याने गोल्डन रंगाच्या कांजीवरम साडीची निवड केली होती. या साडीची किंमत ७५ लाख इतकी होती. साडी खरे सिल्क आणि खऱ्या सोन्याच्या धाग्यांनी तयार केली होती.

शिल्पा शेट्टी  :
शिल्पाने देखील तिच्या लग्नात कांजीवरम साडीला पाषाणी दिली होतो. तिची साडी डिझायनर तरुण तहिलियानीने तयार केली होती. या साडीमध्ये ८००० स्वारोवस्की क्रिस्टलचा वापर केला गेला होती. साडीची किंमत ५० लाख इतकी होती.

करीना कपूर :
२०१२ साली करिनाने सैफ अली खानसोबत लग्न केले. या लग्नात करिनाने मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला लेहेंगा घातला होता, ज्याची किंमत ५० लाख होती.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी स्वत:ला स्टारकिड मानत नाही’; अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीचे मोठे वक्तव्य

-‘इंडियन आयडल १२’च्या ग्रँड फिनालेने टेलिव्हिजन विश्वात नोंदवला ‘हा’ खास विक्रम; टीमने आनंद साजरा केला

-‘बिग बीं’च्या सुरक्षेत तैनात हेड कॉन्स्टेबलची झाली बदली; पगाराची माहिती मिळताच बॉडीगार्डविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश

 

हे देखील वाचा