बॉलिवूडमध्ये कलाकार हे आपल्या मुलांचे वाढदिवस कायमच हटक्या पद्धतीने साजरे करताना दिसत असतात. बॉलिवूड स्टार कपल अजय देवगण आणि काजोल यांची मुलगी न्यासा प्रसिद्धीपासून दूर असते, पण ती बर्याचदा चर्चेत असते. न्यासाने मंगळवारी (२० एप्रिल) तिचा १८ वा वाढदिवस साजरा केला. या खास प्रसंगी तिच्या पालकांनी तिच्या वाढदिवशी खास पद्धतीने अभिनंदन केले आहे.
एकीकडे अजयने आपल्या मुलीबरोबर नुकताच काढलेला फोटो शेअर केला आहे, तर दुसरीकडे काजोलने न्यासाचे बालपणीचे फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे.
मुलीसह फोटो शेअर करत, न्यासाचे वडील आणि अभिनेता अजयने लिहिले, ‘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गोड न्यासा. या कठीण दिवसांमध्ये छोट्या विश्रांतीसाठी हा वास्तविक आनंदाचा क्षण आहे. यासह, मी त्या सर्वांना विनंती करतो, ज्यांनी निरोगी असले पाहिजे. ‘
काजोलनेही न्यासाच्या बालपणीचे फोटो शेअर केले आहेत. तिने लिहिले की, ‘आज मी असे म्हणू शकते की, मी खरोखरच उत्तीर्ण झाले आहे. कारण तुझ्याकडे त्या सर्व गोष्टी आहेत ज्या एका महिलेकडे असल्या पाहिजेत. म्हणून आयुष्यात उंच भरारी घे आणि कोणासमोर नमू नकोस. मी तुझ्याबरोबर आहे, तारुण्याच्या शुभेच्छा. तुझ्याकडे या सर्व गोष्टी आहेत, म्हणून तू तुझ्या शक्तीचा योग्यरीत्या वापर कर.”
न्यासा सध्या परदेशात शिक्षण घेत आहे. परंतु कोरोना साथीमुळे न्यासा तिच्या कुटुंबासमवेत आहे. न्यासा लाईमलाईटपासून दूर राहते, आणि बर्याचदा तिच्या पालकांसमवेतही दिसत असते. वाढत्या कोरोनामुळे न्यासाचे कुटुंब हे एकत्रित वेळ घालवताना दिसत आहेत. अजय देवगणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, त्याच्याकडे सूर्यवंशी, गंगुबाई काठियावाडी, मायडे आणि मैदान हे चित्रपट आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-फिट अँड फाईन! सारा अन् जान्हवीने लुटला मालदीवचा आनंद; एकत्रच केला वर्कआऊट
-‘रजऊ के पढ़ाईब’ नंतर प्रमोद प्रेमीच्या ‘चईत के टेम्परेचर’ गाण्यानेही गाठला मोठ्या व्ह्यूजचा टप्पा!
-कमालच! भोजपुरी स्टार ऋचा दीक्षित आणि प्रवेश लालने केला ‘काली नागिन के जैसी…’ गाण्यावर रोमान्स