आजकाल प्रमोद प्रेमी यादवचे नाव खूप चर्चेत असते. प्रमोद प्रेमीची गाणी बघता बघताच व्हायरल होऊ लागतात. यामधील ‘रजऊ के पढ़ाईब’ गाणे रिलीझ होताच पहिल्याच दिवशी तूफान व्हायरल झाले. त्याचवेळी आता ‘चईत के टेम्परेचर’ या गाण्याचीही धूम सुरू आहे.
प्रमोद प्रेमी एंटरटेनमेंटच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवरून रिलीझ झालेले हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. गाण्याला काही तासांतच लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. यूट्यूबवर गाण्याला भोजपुरी प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. चाहते व्हिडिओखाली कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
कृष्ण बेदर्दी यांनी ‘चईत के टेम्परेचर’ या गाण्याचे गीत लिहिले आहे. तसेच, आर्या शर्माने गाण्याला संगीत दिले आहे. पवन पाल या गाण्याचे दिग्दर्शक आहेत. गाण्याच्या यशाबद्दल उत्सुक असलेल्या प्रमोद प्रेमीने, गाण्याला इतका चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल चाहत्यांचे आभार मानले आहेत.
प्रमोद प्रेमीने गाण्याच्या यशाबद्दल सर्व प्रेक्षकांना धन्यवाद दिले आहे. याबद्दल त्याने अगदी मनापासून सर्वांचे आभार मानले. त्याने लिहिले की, तो सर्व चाहत्यांचा आणि भोजपुरी प्रेक्षकांचा आभारी आहे. यादरम्यान, प्रमोद प्रेमीची अनेक गाणी एकामागून एक हिट होत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-कमालच! भोजपुरी स्टार ऋचा दीक्षित आणि प्रवेश लालने केला ‘काली नागिन के जैसी…’ गाण्यावर रोमान्स
-खेसारी लाल यादवच्या ‘पड़ोसन शोषण करती है’ गाण्याचा यूट्यूबवर राडा! पार केला २८ लाख व्ह्यूजचा टप्पा