Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड पन्नाशी गाठलेल्या अक्षयचा तिशीतल्या मृणालसोबत रोमान्स, प्रश्नांचा भडीमार करत नेटकऱ्यांनी केले ट्रोल

पन्नाशी गाठलेल्या अक्षयचा तिशीतल्या मृणालसोबत रोमान्स, प्रश्नांचा भडीमार करत नेटकऱ्यांनी केले ट्रोल

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी ‘सेल्फी‘ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे नवीन गाणे ‘कुडिये नी तेरी’ रिलीज झाले आहे. व्हॅलेंटाईन वीकच्या निमित्ताने रिलीज झालेल्या या गाण्यात अक्षय कुमार मृणाल ठाकूरसोबत रोमान्स करताना दिसत आहे. त्यांची ही केमिस्ट्री पाहून काही चाहत्यांनी कौतुकाचे पूल बांधले आहेत, तर काही सोशल मीडिया युजर्स अभिनेत्याला माेठ्या प्रमाणात ट्रोल करत आहेत. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेऊया…

वयाच्या 55​​व्या वर्षीही अक्षय कुमार (akshay kumar) याचा फिटनेस कोणत्याही नव्या अभिनेत्यापेक्षा कमी नाही. ‘सेल्फी’ चित्रपटातील नवीन गाण्यात अक्षय कमालीचा दिसत आहे, तर मृणाल ठाकूरही (mrunal thakur) सुंदर दिसत आहे. त्यांच्या जोडीला चाहत्यांची चांगली पसंती मिळत आहे, परंतु अनेक सोशल मीडिया युजर्स अभिनेत्याला जोरदार ट्रोल करत आहेत आणि बाप-लेकीची जोडी सांगत आहेत. यासाठी केवळ अभिनेताच नाही तर मृणालही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. अक्षय कुमार आणि मृणाल ठाकूरची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री अनेकांना आवडलेली नाही.

akshay kumar

akshay kumar ‘सेल्फी’ चित्रपटामध्ये मृणाल ठाकूर छोट्या भूमिकेत आहे. अक्षय कुमारसोबतच्या शूटिंगबाबत मृणालने सांगितले होते की, ‘मला हे गाणे शूट करताना खूप मजा आली, याआधी सेटवर इतकी मजा कधीच आली नव्हती. या गाण्याचे शूटिंग माझ्यासाठी खास होते. आता प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे.’ असे मृणालचे मत हाेते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

मल्याळम चित्रपटचा ‘सेल्फी’ हा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट 24 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात इमनान हाश्मी अक्षय कुमारसाेबत स्क्रिन शेअर करत आहे. (bollywood akshay kumar and mrunal thakur romantic chemistry in selfiee song kudiyee ni teri netizens trolls for age difference)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘ये चाँद सा रौशन चेहरा’, क्रिती सेननचा क्लासी लूक पाहिलात का?

‘आपणच गुंता वाढवायचा आणि…’ अभिनेता कुशल बद्रिकेची ‘ही’ पोस्ट झाली व्हायरल

हे देखील वाचा