Saturday, April 20, 2024

‘सेल्फी’ रिलीज हाेण्यापूर्वीच अक्षय कुमार साईबाबांच्या चरणी, शिर्डीमध्ये जाऊन अभिनेत्याने घेतलं साई समाधीचं दर्शन

बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी ‘सेल्फी‘ चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. अक्षय कुमारचा ‘सेल्फी’ चित्रपट 24 फेब्रुवारीला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अक्षय कुमार आज म्हणजेच बुधवारी (दि. 25 जानेवारी)ला शिर्डीच्या साई मंदिरात पोहोचला होता. अक्षय कुमारने साईबाबांचे दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतले. यादरम्यान अक्षय कुमारला पाहण्यासाठी चाहत्यांची चांगलीच गर्दी जमली होती, त्यानंतर अक्षयने एका चाहत्यासोबत असे काही केले की लोक आता त्याचे जोरदार कौतुक करत आहेत.

अक्षय कुमार (akshay kumar) याचा साईबाबांच्या मंदिरात गेल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अक्षय कुमारला सिक्योरिटी घेऊन जात आहे, पण त्याचे चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी उतावळे हाेऊन गर्दीत पुढे येत आहेत. या दरम्यान, एक चाहता अडखळून पडला. चाहता पडताना पाहून अक्षय कुमार लगेच मागे वळला आणि त्याने स्वतः त्या व्यक्तीला उचलले. अशात लोक अक्षय कुमारच्या या स्टाइलचे खूप कौतुक करत आहेत.

अक्षय कुमार जेव्हा साईबाबांच्या मंदिरात पोहोचला तेव्हा तिथे मोठी गर्दी झाली होती. याच गर्दीसोबत अक्षय कुमारनेही मंदिरात पोहोचून साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. अक्षय कुमारने या आधीच खुलासा केला आहे की, तो साईबाबांचा भक्त आहे. याआधीही ताे अनेकवेळा साईबाबांच्या चरणी आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात पाेहचला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षय कुमारसोबतच चित्रपटाचे निर्मातेही ‘सेल्फी’चे जोरदार प्रमोशन करत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाल्यापासून अक्षय आणि इमरान हाश्मीचे चाहते चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. या ट्रेलरला सोशल मीडियावर युजर्सचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अक्षय कुमार आणि इमरान हाश्मीची जोडी लोकांना खूप आवडत आहे.(bollywood actor akshay kumar reached shirdi sai baba mandir selfiee star picked up himself fan who fell in crowd video viral)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रियांकाची लेक समुद्रकिनाऱ्यावर दिसली वाळूशी खेळताना, एकदा पाहाच फाेटाे

वेणीमध्ये दिसणारी ही मुलगी आहे ‘टीव्ही क्वीन’, लाखाे हृदयांवर करते राज, ओळखा बरं काेण?

हे देखील वाचा