Wednesday, July 3, 2024

दिवंगत सिद्धार्थच्या आठवणीत आलिया अन् वरुण भावनिक; जुना फोटो शेअर करत लिहिली भावुक पोस्ट

टेलिव्हिजन अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे गुरुवारी (२ सप्टेंबर) निधन झाले. तो ४० वर्षांचा होता. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे सांगितले जात आहे. अचानक झालेल्या निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. सिद्धार्थच्या जाण्याने चाहत्यांसोबत कलाकारही भावुक झाले आहे. आपल्या अवतीभोवतीच्या व्यक्तीची अचानक होणारी एक्झिट अनेकांच्या मनाला चटका लावणारी असते. तशीच सिद्धार्थच्या जाण्याने चाहत्यांच्या मनात एक पोकळी निर्माण झाली आहे, जी कोणीही भरून काढू शकणार नाही. अनेक कलाकार सिद्धार्थला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहेत. तसेच अनेकांनी त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.

अभिनेत्री आलिया भट्टने दिवंगत सिद्धार्थसोबतचा एक जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच पोस्ट करताना तिने लिहिले की, “सिद्धार्थ प्रेमळ, दयाळू आणि सर्वात वास्तविक लोकांमधील एक होता. मी त्याच्यासोबत काम केलं होतं. तो नेहमीच हसतमुख आणि नेहमीच सकारात्मक असायचा. त्याचे कुटुंब, प्रिय लोक आणि त्याच्या चाहत्यांना माझ्या मनापासून संवेदना. आत्म्यास शांती लाभो.”

Photo Courtesy: Instagram/aliaabhatt

सिद्धार्थने अनेक मालिका आणि रियॅलिटी शोमध्ये काम केले होते. २०१४ मधील लोकप्रिय चित्रपट ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’मध्येही त्याने काम केले, ज्यात वरुण धवन आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसले होते.

आलिया भट्ट व्यतिरिक्त वरुण धवननेही सिद्धार्थ शुक्लाला श्रद्धांजली वाहिली आहे. वरुण धवनने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर करताना लिहिले की, “भावपुर्ण श्रध्दांजली भावा. तुझ्यावर अनेकजण प्रेम करतात आणि तुझ्या प्रेमळ स्वभावाने आणि सुंदर व्यक्तिमत्त्वाने अनेकांना प्रभावित केले आहे. आज स्वर्गालाही एक तारा मिळाला आहे आणि आम्ही तो गमावला आहे. त्याच्या कुटुंबीयांना आणि प्रियजनांना माझ्या मनापासून संवेदना.”

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचा जन्म १२ डिसेंबर, १९८० साली झाला होता. त्याने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. त्याने २००८ मध्ये इंडस्ट्रीत पदार्पण केले. टीव्ही मालिका ‘बालिका वधू’द्वारे घराघरात त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सिद्धार्थचा अंतिम प्रवास सुरू, लवकरच होणार पंचतत्वात विलीन

-‘मृत्यू हे आयुष्यातील सर्वात मोठे…’, मृत्यूनंतर सिद्धार्थ शुक्लाचे जुने ट्वीट व्हायरल

-सिद्धार्थ शुक्लाने शहनाझ गिलच्या कुशीत घेतला अखेरचा श्वास? म्हणाली, ‘मी आता कसं जगू शकेन’

हे देखील वाचा