Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘बिग बीं’च्या घरात निर्माण झालीय पाण्याची समस्या? ब्लॉगमध्ये कामाबद्दल व्यक्त केली चिंता

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या त्यांच्या ‘चेहरे’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. ‘चेहरे’ चित्रपट शनिवारी (२८ ऑगस्ट) ला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. तर अमिताभ सध्या या दिवसात तो ‘केबीसी १३’ चे शूटिंग करत आहेत. बिग बी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्यांनी आपल्या ब्लॉगद्वारे खुलासा केला आहे की, नुकतीच त्यांच्या स्वत:च्या घरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले की, “खूप कष्ट करावे लागेल. उद्या संध्याकाळपर्यंत काही तोडगा निघाला पाहिजे, काहीतरी उपाय  निघाला पाहिजे. त्याचा उपयोग होईल, पण आता बघूयात. आज खूप उशीर झाला आहे, शरीर खूप थकले आहे. म्हणूनच पूर्वीपेक्षा केबीसीच्या शूटिंगसाठी लवकर गेलो होतो. मी सकाळी ६ वाजता उठलोय, पण घरात पाणी येत नाहीये.”

अमिताभ ब्लॉगमध्ये पुढे लिहितात, “सिस्टम पुन्हा सुरू झाले आहे. मला कनेक्ट होण्यासाठी वेळ मिळत आहे. मी हे अजून ५ मिनिटे बघणार आहे आणि मी काम थांबवणार आहे. मग नंतर कामावर जायचं आहे, व्हॅनि़टी व्हॅनमध्ये तयार व्हायचं आहे. प्रिय, घरगुती समस्येमध्ये तुम्हा सर्वांना सामील केल्याबद्दल माफ करा. पण ठीक आहे .. आता अजुन नाही. आजचा दिवस थोडा कठीण होता.”

अमिताभ बच्चन जगभरातील त्यांच्या चाहत्यांशी संपर्कात राहण्यासाठी ब्लॉगची मदत घेतात. त्यांनी १७ एप्रिल २००८ रोजी पहिला ब्लॉग लिहिला. सोशल मीडियाचे हे युग सुरू झाल्यापासून, ते त्यावर खूप सक्रिय असतात आणि याद्वारे आपले विचार चाहत्यांसह शेअर करतात.

अमिताभ यांच्या कामाविषयी बोलायचे झाले, तर त्याचा ‘चेहरे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रुमी जाफरी यांनी केले आहे. अमिताभ बच्चन व्यतिरिक्त या चित्रपटात इमरान हाश्मी, क्रिस्टल डिसूझा, रिया चक्रवर्ती आणि अन्नू कपूर यांच्याही भूमिका आहेत. याशिवाय बिग बी ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘अलविदा’ सारख्या चित्रपटांमध्येही दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राज कुंद्राच्या अटकेदरम्यान शिल्पा शेट्टीने शेअर केली पोस्ट; म्हणाली, ‘मी चूक केलीय…’

-ज्याला राम गोपाल वर्मा म्हणाले होते, ‘हा मी नाही’; तोच व्हिडिओ शेअर करत इनाया म्हणतेय, ‘हे आम्हीच…’

केबीसी: उत्तर माहित असूनही स्पर्धक आशीष सुवर्णाने घेतली नाही रिस्क, ‘या’ प्रश्नावर क्विट करत सोडला शो

हे देखील वाचा