महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच चर्चेत असतात. कधी त्यांच्या वक्तव्यामुळे त्या चर्चेत असतात. त्यांना गायनाची आवड असल्यामुळे त्या नेहमी त्यांच्या गाण्याचे व्हिडीओ शेअर करत असतात. त्यामुळे त्यांचे कधी कौतुक तर कधी त्यांना ट्रोल केले जाते. काही दिवसांपूर्वी त्यांनी परिधान केलेल्या ड्रेसमुळे त्यांना नेटकऱ्यांनी गरीबांची उर्फी अशी उपमा दिली. त्या सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्या नेहमी त्यांचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. नुकताच त्यांनी त्यांची मुलगी दिविजा हिच्या सोबत होळीच्या शुभेच्छा देणारा व्हिडीओ शेअर केला होता. आता तुम्ही म्हणाल की, यात काय विशेष आहे? ह्या व्हिडीओमध्ये एका गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधले ते म्हणजे अमृता फडणवीस यांच्या खांद्यावर बसलेला पोपट. हा साधा सुधा पोपट नाही. त्याची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल…
या व्हिडीओमध्ये अमृता फडणवीस यांच्या खांद्यावर बसलेला निळ्या रंगाचा व पिवळ्या डोळ्यांचा पोपट. या पोपटाने चांगलंच लक्ष वेधून घेतलं आहे. तसेच या पृथ्वीवरील सर्व प्राण्यांना होळीच्या शुभेच्छा असं कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला होता. त्यांच्या या व्हिडीओमधील पोपटाची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल. हा पोपट खुप महागडा असून त्याची किंमत लाखांमध्ये आहे.
View this post on Instagram
व्हिडीओमधील निळा पोपट हा हायसिंथ मकाऊ या प्रजातीचा आहे. अॅनोडोरिंचस हायसिंथिनस (Anodorhynchus Hyacinthinus) हे त्याचं शास्त्रीय नाव आहे. हा पोपट 45 ते 50 वर्षे जगतो. हा पोपट पूर्ण निळ्या रंगाचा असतो. या पक्ष्याच्या डोळ्यांभोवती आणि चोचीजवळ एक चमकदार पिवळ्या रंगाचा गोल असतो. हा इतर प्रजातींपेक्षा आकाराने मोठा असतो. या प्रकारचे मकाऊ पोपट मध्य आणि दक्षिण अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. या पक्ष्याची चोच खूप तीक्ष्ण असते. या चोचीचा उपयोग हे पोपट कठोर फळं फोडण्यासाठी करतात.
‘NE Portal’ ने दिलेल्या वृत्तानुसार, हा दुर्मिळ प्रजातीचा पोपट असून याची भारतातील किंमत तब्बल 40 ते 45 लाख रुपये इतकी आहे. या पोपटांची किंमत देशातील शहरांनुसार बदलत असल्याचंही त्यात म्हटलं आहे. दरम्यान, मकाऊ पोपट हा पक्षी शाकाहारी आहे. (bollywood-amruta-fadnavis-viral-video-parrot-price-in-india)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील ‘या’ अभिनेत्रीने 32 व्या वर्षी एग्स फ्रीज करत घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या यामागचे कारण
‘तारक मेहता…’ फेम ‘शैलेश लोढा’ यांनी एक पोस्ट शेअर करत म्हणाले, ‘अब जंग तो होगी…’