Sunday, December 8, 2024
Home नक्की वाचा ‘भसाडा आवाज आणि…’, म्हणणाऱ्यांना अमृता फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर, गाण्याला 5 दिवसात मिलियन व्ह्यूज

‘भसाडा आवाज आणि…’, म्हणणाऱ्यांना अमृता फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर, गाण्याला 5 दिवसात मिलियन व्ह्यूज

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांचं काही दिवसांपूर्वीच नवीन गाणं मूड बान लिया है प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं असून गाण्याने सोशल मीडियावर धुमाकुळ घातला होता, अनेक रिल्स व्हिडिओ या गाण्यावर बनवण्यात आले होते. अशात त्यांनी (दि, 26 जानेवारी) रोजी त्यांचं नवीन गाणं प्रदर्शित झालं होतं, तेव्हा अनेक नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं होतं.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची पत्नी अमृता फडणवीस (Amruta  या सतत कोणत्या कोणत्या कारणामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधत असतात. त्यांनी आजपर्यत अनेक गाणी गायली आहेत, त्यांचं नुकतंच प्रदर्शित झालेल्या गाण्यााला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. आता पुन्हा एकदा त्यांनी 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘भारतीयन्स’ या चित्रपटातील ‘सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तां हमारा’ हे अमृता फडणवीस यांच्या आवाजातील गाणं प्रदर्शित झालं. अमृताजींनी खास पोस्ट शेअर करत या गाण्याबद्दल माहिती दिली होती.

अमृताजींनी खास पोस्ट शेअर करत या गाण्याचा एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यावर काही नेटकऱ्यांनी ट्रोल करायला सुरुवात केली होती. ‘हा मराठी माणसांवर अत्याचार आहे, भसाडा आवाज आणि अल्बम काढून कोणी सुंदर व स्टार होत नाही’, ‘तुम्ही गाणं गाऊ नका, हा तर देशाचा अपमान’ अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यांची खिल्ली उडवली होती. पण अमृताजीचं हे गाणं लाखो लोकांनी पाहिलं आहे.

युट्युबवरील टी-सिरिजच्या चॅनेलवर अमजताजींच गाणं प्रद्रशित जालं होतं, या गाण्याला पाच दिवसातच 12 मिलियनपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. त्युळे अमजताजींनी देखिल गाणं गाजल्यानंतर ट्रोलर्सला चोख उत्तर दिलं आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
पलट! ऋतुजा बागवेचा लेटेस्ट व्हिडिओ एकदा पाहच
टीव्ही आणि बॉलिवूडमध्ये काम करणारी ‘ही’ प्रसिद्धी अभिनेत्री झाली ग्वालियरची सून, गुपचुप उकरकला लग्नसोहळा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा