Tuesday, March 4, 2025
Home बॉलीवूड मार्चच्या रखरखत्या उन्हात होणार मनोरंजनाची बरसात; हे साऊथ आणि बॉलिवूड सिनेमे होणार रिलीझ

मार्चच्या रखरखत्या उन्हात होणार मनोरंजनाची बरसात; हे साऊथ आणि बॉलिवूड सिनेमे होणार रिलीझ

सिनेप्रेमींसाठी मार्च हा महिना खूपच खास असणार आहे. कारण या महिन्यात अनेक बॉलिवूड तसेच साऊथ चित्रपट सिनेगृहात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. अनेक ऍक्शन, ड्रामा, थ्रिलर आणि रोमान्सने भरलेले सिनेमे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. सलमान खानच्या ‘सिकंदर’ पासून ते पवन कल्याणच्या ‘हरी हरा वीरा मल्लू’ पर्यंत. या महिन्यात काही अतिशय आश्चर्यकारक आणि मोठ्या बॅनरचे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. आता आपण त्याच चित्रपटांची यादी जाणून घेणार आहोत 

द डिप्लोमॅट

द डिप्लोमॅट हा एक राजकीय अॅक्शन ड्रामा चित्रपट आहे जो राजनयिकता आणि आंतरराष्ट्रीय संबंधांमधील गुंतागुंत दाखवेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवम नायर यांनी केले आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. भूषण कुमार निर्मित हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. हा चित्रपट ७ मार्च २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.

केसरी वीर

केसरी वीर १४ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. केसरी वीरचे दिग्दर्शन प्रिन्स धीमान यांनी केले आहे. या चित्रपटात सूरज पंचोली, सुनील शेट्टी, विवेक ओबेरॉय आणि आकांक्षा शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. कनु चौहान हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

सिकंदर

सिकंदर हा एक मोठ्या बजेटचा बॉलीवूड चित्रपट आहे. ज्यामध्ये जबरदस्त अ‍ॅक्शन आणि थ्रिलर असेल, ज्याचे लेखन आणि दिग्दर्शन ए.आर. मुरुगदास यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला यांनी केली आहे. या चित्रपटात सलमान खान मुख्य भूमिकेत आहे, तर रश्मिका मंदान्ना, काजल अग्रवाल, सत्यराज, शर्मन जोशी आणि प्रतीक बब्बर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘सिकंदर’ हा चित्रपट ईद-उल-फित्रच्या निमित्ताने २८ मार्च २०२५ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

लुसिफर

हा ‘लुसिफर’ चित्रपटाचा सिक्वेल आहे, जो मोहनलालचे चाहते बऱ्याच काळापासून पाहण्यास उत्सुक आहेत. हा चित्रपट २०१९ च्या ब्लॉकबस्टर मल्याळम चित्रपट ‘लुसिफर’ चा सिक्वेल आहे. या चित्रपटातही मोहनलाल लुसिफरच्या भूमिकेत परतत आहे. ‘लुसिफर’ हा अभिनेता पृथ्वीराज सुकुमारनचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट होता. हा चित्रपट २७ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.

हरि हरा वीरा मल्लू

पवन कल्याण अभिनीत ‘हरि हरा वीरा मल्लू’ हा एक अ‍ॅक्शन-ड्रामा आहे जो वीरता आणि ऐतिहासिक घटनांचे चित्रण करेल. या चित्रपटात पवन १७ व्या शतकाच्या पार्श्वभूमीवर आधारित कथेने चाहत्यांचे मनोरंजन करणार आहे. ज्योतिकृष्ण दिग्दर्शित हा चित्रपट २८ मार्च रोजी तेलुगू, तमिळ, हिंदी, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

पुष्पा २ चे रोकॉर्ड मोडत छावाने तिसऱ्या आठवड्यातही मारली बाजी; केली इतकी कमाई
‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’चे चित्रीकरण संपन्न

हे देखील वाचा