Monday, July 1, 2024

जॅकी श्रॉफमुळे अनिल कपूर यांना वाटायचे असुरक्षित, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

करण जोहरच्या शो ‘कॉफी विथ करण 7’ चा 11वा भाग देखील नेहमीप्रमाणेच मजेशीर होता. यावेळी अनिल कपूर आणि वरुण धवन एकत्र शोमध्ये सहभागी झाले होते. या शोमध्ये दोघांनीही त्यांच्या लग्न, चित्रपट आणि इतर अनेक गोष्टींबद्दल मोकळेपणाने बोलले. यासोबतच शोमध्ये करणने अनिल कपूरला इंडस्ट्रीतील नेपोटिझमबद्दल त्याचे मत विचारले. ज्याला अभिनेत्याने चोख उत्तर देऊन प्रेक्षकांची मने जिंकली. यासोबतच अनिल कपूरने अभिनेता जॅकी श्रॉफबद्दल खुलासा केला आहे.

अनिल कपूर हे बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेते म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी सिनेसृष्टीत प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. अलिकडेच  ते करण जोहरच्या कॉफी विथ करण कार्यक्रमात सहभागी झाले होते. ज्यामध्ये त्यांनी जॉकी श्रॉफ यांच्याबद्दल मोठा खुलासा केला.

अनिल कपूर म्हणाले, “जॅकीला सुभाष घई यांनी लाँच केले आणि लगेचच ए-लिस्टर बनले. मी सनी (देओल), संजू (संजय दत्त) यांना पाहायचो आणि अनुभवायचो. मी छोट्या भूमिका करत होतो, मी दक्षिण भारतीय सिनेमात काम करत होतो, तर जॅकी, जो नेहमीच लोकांचा आवडता राहिला आहे. बाहेरचा माणूस असूनही त्याला सुभाष घई यांनी लाँच केले. मी त्याच्याबद्दल खूप विचार करायचो.

अनिल कपूर पुढे म्हणतात, “जॅकी नेहमीच खूप प्रसिद्ध होता. त्याचे ऑटोग्राफ घेण्यासाठी लोक यायचे आणि त्याला ऑटोग्राफ डायरी द्यायचे, पण ते आधी मला द्यायचे आणि ‘हे तुमच्यासाठी आहे’ म्हणायचे. त्यांनी माझ्यासाठी हे केले, पण मला माहित होते की ते माझ्यासाठी नाही तर जॅकीसाठी आले होते.” दरम्यान अनिल आणि जॅकी कधीकाळी खूप प्रसिद्ध होते. त्यांची जोडी लोकांना खूप आवडली. ‘टोटल धमाल’, ‘राम लखन’, ‘त्रिमूर्ती’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये ही जोडी एकत्र दिसली होती.

हेही वाचा –  ‘मी १० दिवस फक्त पाणी पिऊन काढले’, केआरकेने सांगितला तुरुंगातील भयाण अनुभव
सुंदरता अशी की, पाहताक्षणीच पडाल प्रेमात! पाहा सोनालीची फोटो गॅलेरी
रिचा चड्ढाच्या चाहत्यांनी अली फजल सोडून भलत्याच अलीसोबत बनवली जोडी, अभिनेत्रीने ट्वीटद्वारे दिले उत्तर

हे देखील वाचा