Saturday, June 29, 2024

ठरलं रे! सुनिल शेट्टीची लाडकी आथिया ‘या’ दिवशी अडकणार लग्नबंधनात

भारतीय क्रिकेटर के एल राहुल आणि सुनिल शेट्टी याची मुलगी अथिया शेट्टी यांनी आपल्या नात्याची कबुली दिल्यापासून अनेक चाहते यांच्या लग्नाची अत्सुकतेने वाट पाहात आहेत. अनेकवेळा सुनिला शेट्टी याला देखिल सतत पॅपराझी प्रश्न विचारायचे. पण आता लवकरच हे जोडपं लग्नबंधनात अडकणार आहे. यांच्या लग्नाशी निगडित एक बातमी समोर येत आहे.

माध्यमातील वृतत्तानुसार क्रिकेटर केएल राहुल (K.L. Rhaul) आणि अभिनेता सुनिल शेट्टी (Suniel Shetty) याची लाडकी लेक आथिया शेट्टी (Athia Shetty) यांचं लग्न या महीन्यानंतर होण्याची शक्यता आहे. लग्नामधील होणारे छोटे मोठे कार्यक्रम सुनिल शेट्टीच्या घरी पार पडणार आहेत. सांगायचे झाले तर खंडाळामधील निसर्गरम्य वातावरणात झाडाझुडपांच्या सुंदरतेमध्ये अभिनेत्याचा बंगला आहे, जो कोणत्या रिसॉर्टपेक्षा कमी नाही. ही जागा आथिया आणि राहुलच्या लग्नासाठी खूपच चांगली आहे.

असेही म्हटले जात आहे की, लग्नानंतर राहुल आणि आथियाच्या लग्नाचं ग्रॅंड रिसेप्शनही एप्रिल महिन्यात होणार आहे. या लग्नामध्ये भारतीय क्रिकेट संघामधील अनेक क्रिकेटर्सला आमंत्रण असणार आहे. त्याशिवा बॉलिवूड आणि अद्योगामधील अनेक मोठमोठे कालाकार आणि उद्योगपती हजेरी लावण्याची शक्यता असणार आहे.

 

View this post on Instagram

 

केएल राहुल आणि आथिया शेट्टी सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतात. सतत एकमेकांचे फोटो शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असतात. नुकतंच दोघांनी नवीन वर्षाची सुरुवात दुबईमधील आलिशान हॉटेलमधून केली आहे. त्याशिवाय दोघांनी सोशल मीडियावर या वीकेंडचे फोटो देखिल शेअर केले होते. सोशल मीडियावर यांचे फोटो तुफान व्हायरल झाले होते.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बला’त्कार प्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्याने 7 वर्ष फाेडली खडी, आता आराेप करणारीच म्हणतेय…
‘केसरिया तेरा इश्क है पिया’, माेनालिसाच्या हटके पाेज पाहिलेत का?

हे देखील वाचा