Friday, July 5, 2024

एकच नंबर! बादशाहसोबत दिसला ‘बचपन का प्यार’ फेम सहदेव दिरदो, रॅपर म्हणाला, ‘…लवकरच येत आहे’

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका शाळकरी मुलाच्या आवाजातीmल ‘बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे’ या गाण्याने सगळीकडेच धुमाकूळ माजवला आहे. या गाण्याला दोन वर्षांपूर्वी सहदेव दिरदोने गायल होते. सहदेवचे गाणे ऐकल्यावर रॅपर बादशाहने व्हिडिओ कॉल करून सहदेवला चंदीगडला येण्याचे निमंत्रण दिले. आता बादशाहने सहदेवसोबत एक फोटो शेअर केला आहे, जो की खूप व्हायरल होत आहे.

रॅपर बादशाहने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याचा आणि सहदेव दिरदोचा एक फोटो शेअर केला आहे. शेअर केलेल्या फोटोत दोघेही हसत कॅमेऱ्याकडे पाहताना दिसत आहेत. फोटो शेअर करत बादशाहने कॅप्शन मध्ये लिहिले, “लहानपणीचं प्रेम लवकरच येत आहे.” या पोस्टमूळे बादशाहचे चाहते सुद्धा खूप उत्सुक आहेत. फोटोला आता पर्यंत सहा लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. यूट्यूबर आशीष चंचलानी फोटोवर प्रतिक्रिया देत म्हणाला ‘क्या बात है.’ बादशाहचे लाखो चाहते या फोटोवर प्रतिक्रिया देत आहेत.

सहदेव दिरदोने गायलेल गाणं ‘बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे’ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झालं आहे. इतकंच नाही, तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या आग्रहामुळे सहदेवने आपल्या स्टाईलमध्ये हे गाणं ऐकवलंही होतं. मुख्यमंत्री बघेल यांनी सहदेवच्या गायन स्टाइलची स्तुती करत भविष्यासाठी त्याला शुभेच्छा दिल्या. सहदेवच्या गाण्यामुळे बरेच मीम्स व्हायरल झालेत. सहदेवने हे गाणं गावातील लग्नामध्ये ऐकलं होतं आणि तो ते गाणं गुणगुणत होता. ज्या आत्मविश्वासाने सहदेवने हे गाणं गायलं आहे, लोक त्याचे चाहते होत आहेत. सध्या शाळकरी मुलांनी आणि तरुणाईने देखील या गाण्याला डोक्यावर घेतले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जिया खान आत्महत्या प्रकरणाची धुरा विशेष सीबीआयच्या हातात; सूरज पांचोली म्हणाला, ‘…मला शिक्षा झालीच पाहिजे’

-करिश्मासोबत नाते तोडून अभिषेकने का केले तीन वर्षांनी मोठी असणाऱ्या ऐश्वर्यासोबत लग्न? कारण ऐकून व्हाल हैराण

-लाजुन लाल झाला शाहिद कपूर, जेव्हा मीराने शेअर केले बेडरूम सिक्रेट; म्हणाली, ‘मला वाटतं तो कंट्रोल…’

हे देखील वाचा