सुनिल शेट्टीचा २५ वर्षीय मुलगा अहानच्या मित्रांची नावं वाचून तुम्हालाही बसेल धक्का, डिनो मोरियापासून ते…

bollywood bollywood actor ahan shetty debut from film tadap he is like his father suniel shetty


जेव्हा एखाद्या स्टारचा मुलगा फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करत असतो, तेव्हा प्रेक्षक बर्‍याचदा त्यामध्ये त्याच्या वडिलांची प्रतिमा शोधू लागतात. बॉलीवूडचा ‘अण्णा’ म्हणजेच सुनील शेट्टी यांचा मुलगा अहान शेट्टी याच्या बाबतीतही असेच काहीसे घडत आहे.

अहानचा पहिला चित्रपट ‘तडप’ या वर्षी 24 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी इंडस्ट्रीच्या सर्व बड्या स्टार्सनी अहानचे अभिनंदन केले आहे. अहान बॉलिवूडमध्ये नवीन आहे, म्हणूनच लोकांचा त्याच्यातला रस वाढला आहे. अहानचा लूक तर सुनीलला मिळताजुळता आहेच, पण त्याच्या सवयीही वडिलांप्रमाणेच असल्याचे पाहायला मिळते.

25 वर्षीय अहानने प्राथमिक शिक्षण मुंबईत, तर पुढचे शिक्षण अमेरिकेतून पूर्ण केले. अहानचे वडील सुनील शेट्टी बॉलिवूडमधील दिलदार मित्र मानले जाते. वडिलांप्रमाणेच अहानचीही सर्वांशी लवकर मैत्री होते. रणबीर कपूर, डिनो मोरिया, अपारशक्ति खुराना आणि लिएंडर पेस हे अहानचे खास मित्र आहेत.

अहान शेट्टी एक चांगला फुटबॉलपटूदेखील आहे. शालेय वेळात तो त्याच्या शाळेतील फुटबॉल संघाचा कर्णधार होता. रणबीर कपूर आणि डिनो मोरिया या मित्रांसोबत तो बर्‍याचदा फुटबॉल खेळताना दिसतो. सुनील शेट्टी यांनाही खेळाची बरीच आवड आहे.

अहान शेट्टीला फुटबॉल खेळण्याचे पाहिले प्रशिक्षण वडील सुनीलने दिले. सुनील शेट्टी लहानपणापासूनच अहानबरोबर फुटबॉल खेळायचे. अहानही वडील सुनील शेट्टीप्रमाणे स्टाइलिश आहे. बापलेकाचा स्वॅग अगदी पाहण्यासारखा असतो.

अहान शेट्टीला संगीताचीही खूप आवड आहे. गिटार वाजवण्याबरोबरच अहान गाणे ही गातो. अहानचे वडील सुनील शेट्टी यांना त्यांच्या मुलाच्या सामर्थ्यावर खूप गर्व आहे. अहान शेट्टी वडीलांसह बहीण अथिया शेट्टीच्याही खूप जवळ आहे. अथियाचे वय २८ वर्ष असून ती २८ वर्षीय स्टार भारतीय क्रिकेटपटू केएल राहुलला डेट करते. तर २५ वर्षीय अहानचे नाव तानिया श्रॉफबरोबर जोडले जाते.

सुनील शेट्टी स्वतः बॉलिवूडमधील चढ-उतार पाहत आले आहेत. म्हणूनच त्यांनी आपल्या मुलाला अपयशाला सामोरे जाण्यास शिकविले आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.