‘शेरशाह’च्या ट्रेलरला बॉलिवूड कलाकारांची पसंती; अक्षय कुमारपासून ते आलिया भट्टपर्यंत यांनी केले कौतुक


सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांच्या ‘शेरशाह’ या चित्रपटाचा ट्रेलर रविवारी (२५ जुलै ) प्रदर्शित झाला आहे. करण जोहर याची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाला कारगिलमधील द्रासमध्ये भारतीय सेना दलातील जवानांसोबत लॉन्च केले गेले होते. या कार्यक्रमात सीडीएस बिपीन रावत प्रमुख पाहुणे म्हणून गेले होते. यावेळी त्यांनी शेरशाह उर्फ कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या शौर्याची कहाणी सर्वांना सांगितली. आता या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाल्यानंतर, सगळीकडे या चित्रपटाचे कौतुक होत आहे.

सिद्धार्थ मल्होत्राने कॅप्टन विक्रम बत्रा यांचे संपूर्ण आयुष्य प्रेक्षकांसमोर मांडले आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनी या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि चित्रपटाचे कौतुक केले आहे. अक्षय कुमारने ट्विटरवर लिहिले आहे की, “एक रील हीरो एका रिअल हीरोला काय श्रद्धांजली देऊ शकतो. तुमच्या बलिदानाने आमचे जीवन प्रेरित झाले आहे. या शिवाय मी काहीच म्हणू शकत नाही. परमविर चक्र पुरस्कार विजेता कॅप्टन विक्रम बात्रा माझा जन्मदिवस तुमच्यासोबत शेअर करताना मी स्वत:ला खूप भाग्यवान समजत आहे.”

 

आलिया भट्टने देखील अशीच भावना व्यक्त करत ट्वीट केले आहे की, “देवा किती छान ट्रेलर आहे. आपल्या कारगिल युद्धातील हिरोची प्रेरक कहाणी बघण्यासाठी मी जास्त वाट नाही पाहू शकत. ‘शेरशाह’च्या पूर्ण टीमला शुभेच्छा. हा चित्रपट पाहण्यासाठी मी आणखी जास्त वाट पाहू शकत नाही.”(Bollywood celebrities praised siddharth malhotra aani Kiara adwani’s shershah movie trailer)

जान्हवीने लिहिले आहे की, “असा धाडसीपणा, इच्छाशक्ती नेहमीच प्रेरित करते. ‘शेरशाह’च्या पूर्ण टीमने ही प्रेरक कहाणी स्क्रीनच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहचवली. त्यासाठी सर्वांना खूप प्रेम आणि शुभेच्छा. मी हा चित्रपट बघण्यासाठी आता जास्त वेळ वाट नाही पाहू शकत.”

यासोबतच अनन्या पांडे, सारा अली खान आणि विकी कौशल यांनी देखील या चित्रपटाबाबत त्यांचा उत्साह सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच त्यांच्या टीमला शुभेच्छा देखील दिल्या आहेत. प्रेक्षक देखील हा चित्रपट बघण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लाल कमाल!! सारा अली खानने शेअर केले लाल लेहंग्यामध्ये फोटो; पाहायला मिळालं अभिनेत्रीचं मनमोहक सौंदर्य

-खरंच की काय! ऐश्वर्या राय होणार दुसऱ्यांदा आई? व्हायरल फोटो पाहून सोशल मीडियावर रंगल्यात चर्चा

-‘गुड्डी माझी सर्वात मोठी फॅन होती…’ म्हणत, धर्मेंद्र यांनी जया बच्चनसोबतच्या जुन्या आठवणींना दिला उजाळा


Leave A Reply

Your email address will not be published.