‘गुड्डी माझी सर्वात मोठी फॅन होती…’ म्हणत, धर्मेंद्र यांनी जया बच्चनसोबतच्या जुन्या आठवणींना दिला उजाळा


कलाकार म्हटले की, त्यांना नेहमीच विविध चित्रपटांच्या निमित्ताने अनेक कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळते. या निमित्ताने वेगवेगळ्या जोड्या देखील आपल्याला पाहायला मिळतात. जेव्हा कधी भविष्यात आपल्याला एखादी जुनी आठवण पुन्हा बऱ्याच वर्षांनी पडद्यावर पाहायला मिळते, ही रसिकांसाठी एक पर्वणीच असते. ऑल टाइम हिट जोड्यांमध्ये किंवा ऑल टाइम लोकप्रिय जोड्यांमध्ये एका जोडीचा विशेष उल्लेख करावा लागेल आणि ती म्हणजे धर्मेंद्र आणि जया बच्चन. दोन दिग्गज कलाकार एकत्र येणार म्हटल्यावर फॅन्ससोबतच कलाकार देखील उत्साहित असतात. असाच उत्साह धर्मेंद्र यांनी दाखवत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

धर्मेंद्र यांनी खूप वर्षांपूर्वीचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून, यात ते जया बच्चन यांच्यासोबत दिसत आहेत. या फोटोमध्ये जया आणि धर्मेंद्र यांच्या गळ्यात फुलांचा हार दिसत असून, दोघांच्याही चेहऱ्यावर हसू दिसत आहे. या फोटोमध्ये जया एकटक धर्मेंद्र यांच्याकडे बघत आहेत. हा फोटो शेअर करताना धर्मेंद्र यांनी लिहिले की, “खूप वर्षांनी आपल्या गुड्डीसोबत. गुड्डी जी कधी माझी खूप मोठी फॅन होती. एक आनंदाची बातमी.” लवकरच धर्मेंद्र आणि जया बच्चन एकत्र काम करताना दिसणार आहेत.

हा फोटोपाहून अनेक युजर्स यावर एका पेक्षा एक मस्त कमेंट्स करत आहे. एकाने लिहिले, ‘धर्मेंद्र सर, खूपच सुंदर सिनेमा होता.’ धर्मेंद्र यांनी जया बच्चन यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘चुपके-चुपके’, ‘गुड्डी’, ‘पिया का घर’, ‘शोले’, मात्र शोलेमध्ये धर्मेंद्र आणि जया यांची जोडी नव्हती. अगदी ब्लॅक अँड व्हाइट चित्रपटांपासून ते अगदी आतापर्यंत त्यांनी त्यांच्या चार्मने, अभिनयाने आणि ऍक्शनने प्रेक्षकांचे मनोरंजन केले किंबहुना करत आहेत. (dharmendra shares throwback picture with guddi aka jaya bachchan)

धर्मेंद्र लवकरच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटात जया बच्चन यांच्यासोबत दिसणार आहे. या सिनेमात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट मुख्य भुमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा २०२२ साली प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे. धर्मेंद्र या सिनेमाशिवाय लवकरच ‘अपने २’मध्ये सनी देओल, बॉबी देओल सोबत दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बऱ्याच दिवसांनंतर ‘गर्ल गँग’सोबत पार्टी करताना दिसली करीना कपूर खान; अरोरा बहिणींसह महिप कपूरनेही लावली हजेरी

-दुःखद! ज्येष्ठ कन्नड अभिनेत्री जयंती काळाच्या पडद्याआड; झोपेत असतानाच घेतला त्यांनी अखेरचा श्वास

-शो सोडल्याच्या चर्चांवर मुनमुन दत्ताने लावला पूर्णविराम; म्हणाली, ‘…तुम्हाला खरं जाणून घेण्याचा अधिकार आहे’


Leave A Reply

Your email address will not be published.