बाॅलिवूडमधील काही सेलिब्रिटी खूपच जीवनशैली आयुष्य जगतात. अशा काही स्टार्सबद्द्ल जाणून घेऊया, ज्यांच्याकडे स्वतःच प्राइवेट जेट आहे. मनाेरंजन क्षेत्रातले कलाकार कसे राहतात, काय घालतात, काय करतात, हे सगळं लाेकांना खूप उत्सुकतानं जाणून घेण्याचं काम असतं. त्यांची स्टाइल, शाैक आणि आलिशान लाईफस्टाइल लाेकांना भारीच आवडते. काही बाॅलिवूड स्टार्स तर इतके श्रीमंत आहेत की त्यांनी स्वतःच प्राइवेट जेट घेतलयं, जेणेकरुन त्यांचं प्रवास करणं साेपं आणि आरामदायक हाेईल.
बॉलीवुडचे महानायक अमिताभ बच्चन साधं आणि साेज्वळ आयुष्य जगताना आपण नेहमी पाहताे. पण त्यांच्याकडे स्वतःच प्राइवेट जेट आहे. ते या जेट मधून आरामात प्रवास करतात. रिपाेर्टनुसार या जेटची किंमत तब्बल 260 काेटी रुपये आहे. अभिनेता अजय देवगन कायम साधा आणि झगमगाटापासून लांब राहतो असं पाहतो. पण त्याच्याकडेही स्वतःचं प्रायव्हेट जेट आहे! मीडिया रिपोर्टनुसार या जेटचे किंमत सुमारे 84 कोटी रुपये आहे आणि ते सहा जण बसू शकतील असं सिक्स सीटर आस छोटं आणि प्राइवेट जेट आहे.
बॉलीवूडची धक-धक गर्ल म्हणजेच माधुरी दीक्षित ह्या मोठ्या आणि फेमस अभिनेत्रींपैकी एक आहेत. आणि, त्यांच्याकडेही स्वतःचं प्राइवेट जेट आहे! बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खानकडेही स्वतःचं प्राइवेट जेट आहे. तो या जेटमधून आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवायला, फिरायला जातो.
बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारकडे ही स्वतःचं खासगी विमान आहे! मीडिया रिपोर्टनुसार या जेटची किंमत जवळपास 260 कोटी रुपये आहे. आणि सध्या तो नवीन चित्रपट ‘हाउसफुल 5’ मुळे खूप चर्चेत आहे. बॉलीवूडचे भाईजान म्हणजेच सलमान खानही कुणापेक्षा कमी नाहीत! त्याच्याकडेही स्वतःचं प्राइवेट जेट आहे, आणि तो सुट्ट्यांमध्ये मजा करण्यासाठी याचा वापर करतो.
देसी गर्ल म्हणजेच प्रियंका चोप्रा ऐषआरामात जीवन जगताना नेहमीच दिसते. तिच्याकडेही स्वतःचं प्राइवेट जेट आहे. ती हे जेट भारतातून लॉस एंजेलिसपर्यंत जायला वापरते, आणि त्याचबरोबर वैयक्तिक आणि कामाच्या गोष्टींसाठीही वापरते अगदी स्टायलिशपणे! फिल्मी दुनियेतील फेमस अभिनेता सैफ अली खानकडेही स्वतःचं प्राइवेट जेट आहे. तो हे जेट आपल्या कुटुंबासोबत छान वेळ घालवायला, मजा करायला वापरतो अगदी मस्तपणे!
अनिल कपूरकडेही स्वतःचं प्रायव्हेट जेट आहे. तो हे जेट वैयक्तिक आणि कामाच्या गोष्टींसाठी वापरतो अगदी आरामात आणि स्टाइलमध्ये! गाण्याच्या जगात नाव कमावलेला दिलजीत दोसांझकडेही स्वतःचं प्राइवेट जेट आहे! ही गोष्ट फार लोकांना माहिती नाही. या यादीत बॉलीवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टीचंही नाव आहे! तिच्याकडेही स्वतःचं प्राइवेट जेट आहे. बॉलीवूडचा हँडसम हिरो ऋतिक रोशनकडेही स्वतःचं प्राइवेट जेट आहे! तो हे जेट फिरण्यासाठी, मस्त सैर करण्यासाठी वापरतो.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
अशाप्रकारे शोलेमध्ये झालेली अमिताभ बच्चन यांची एंट्री; धर्मेंद्र यांनी केला मोठा खुलासा
११ दिवसांनी दीपिका कक्करला मिळाला डिस्चार्ज; पती शोएबने दिली माहिती